शिक्षण

मराठी माध्यमाची मुले सर्वच क्षेत्रात प्रगती पथावर..! दीपक भोगटे.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीनेप्राथमिक शाळा पेंडूर नं १ येथे मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. मराठी माध्यमाची मुले सर्वच क्षेत्रात प्रगती पथावर असल्याचे प्रतिपादन कार्यवाही दीपक भोगटे यांनी यावेळी केले. मराठी बोलण्याचा न्यूनगंड न बाळगता नेहमी मराठी भाषेचा वापर करा. अत्यंत कठिण काळात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आदी संतानी मराठी भाषा जागतिक स्तरावर नेऊन ठेवली. साऱ्याच संतांचे मराठी भाषा संवर्धनात मोठे योगदान आहे.

आपण मराठी शाळेत शिकतो याचा सार्थ अभिमान बाळगा असे आवाहन त्यांनी केले.संगीताचार्य भारत पेंडूरकर यानीमराठी भाषेत समृद्ध अशी संगीत परंपरा असून लता मंगेशकर सारख्या भारतरत्नाने मराठी भाषेला जागतीक पातळीवर आदराचे स्थान मिळवून दिले. मुख्याध्यापक मारुती चव्हाण यांनी मराठी भाषेचा उगम व व्याप्ती याचीपालकांना माहिती करून दिली. यावेळी पालकांच्या वतीने दीपा पेंडूरकर,श्रीमती म्हापणकर, सौ नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना मराठी दिनाचे औचित्य साधून सेवांगणने आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली व अनेक वर्षानी विद्यार्थी होता आले त्याबद्दल सेवांगणास धन्यवाद दिले.

विद्यार्थी मानस चव्हाण, हषिकेश पेंडूरकर, शुभ्रा नाईक, अनन्या पाटील,यानी मनोगत व्यक्त करताना आमच्या शालेय जीवनातील पहिले बक्षीस सेवांगण कट्टा शाखेकडून मिळालेत्यामुळे आज आम्ही या कार्यक्रमातधीटपणे बोलू शकलो असे प्रतिपादन केले.यावेळी विविध स्पर्धातील पालक व विद्यार्थीयाना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेत भाग घेतलेल्याराऊळ आजींचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अवनी वालावलकर व अवंतिका सावंत या दोन विद्यार्थिनीनी केले.या कार्यक्रमास दीपक भोगटे, भारत पेंडूरकर, विद्या चिंदरकर, मारुती चव्हाण, तांबे गुरुजी, मंगल पराडकर, श्री. पाटील,मनोज काळसेकर, श्रीधर गोंधळी, पालक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मसुरे ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीची शिक्षक प्रश्र्नी पंचायत समितीवर धडक….

news

श्रद्धा चीले ठरली जीवनविद्या विद्यार्थी गुणगौरव सोहळयाची मानकरी.

news

श्री. दाजीसाहेब प्रभूगावकर जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मसुरे नं.१ चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…!

news

Leave a Comment