शिक्षण

महाडी पंचायत समितीचे अतिरिक्त शिक्षकांचे नियमबाह्य समायोजन..! गटशिक्षणाधिकारी यांचा मनमर्जी कारभार.

Spread the love

महाडी: माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्या आदेश क्रमांक डे 6/232/2026 दिनांक 13/2/2026 अन्वये दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पूर्वी सर्व पंचायत समिती अंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी यांच्या अधिनिस्त शिक्षकांचे शासन नियमाचे अधिनस्त राहून समान नियमांचे पालन करून समायोजनाचे अधिकार देण्यात आले.यामध्ये पंचायत समिती मोहाडी अंतर्गत दिनांक 27/ 2/ 2026 ला दुपारनंतर तीन वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी दिनांक 26 /2 /2026 सायंकाळी 5.45 वाजता व्हाट्सअप ला यादी प्रकाशित करण्यात आली.

यामध्ये पदवीधर शिक्षकांची यादी अनुक्रमे विकास ताराचंद कोटांगले पदवीधर शिक्षक व विषय शिक्षक उर्मिला देशमुख, नंदा धोटे,वनवास धनिषकार, राजीव बालपांडे,दिलीपकुमार बडवाईक अशा प्रकारे सामाजिक शास्त्र विषयाची यादी प्रकाशित झाली होती. मात्र कार्यशाळेच्या दिवशी सदर यादी कडे लक्ष न देता आपल्या मनमर्जीने गटशिक्षणाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दुसरी यादी वेळेवर प्रकाशित न करता कार्यशाळेला सुरुवात केली. सदर यादीवर कार्यशाळेच्या दिवशी लेखी आक्षेप घेण्यासाठी सुद्धा वेळ दिला नाही व लेखी आक्षेप घेण्यास नकार देऊन थातूरमातूर कार्यशाळा घेऊन यादीमध्ये सर्वात कनिष्ठ असलेले दिलीपकुमार बडवाईक वेतनश्रेणी धारक नसलेले व विषय शिक्षक असलेले यांना नियमबाह्य पद्धतीने आपल्या मनमर्जीने समायोजन करून पदस्थापना देण्यात आली.

विकास कोटांगले 2002 पासून वेतनश्रेणी धारक पदवीधर शिक्षक आहेत. सदर शिक्षकाने सांगण्याचा प्रयत्न केला व आदल्या दिवशी प्रकाशित झालेल्या यादीनुसार पदस्थापना करण्यात यावी. याबद्दल विचारणा केली असता त्यांचे लेखी आक्षेप न घेता व कसलेही समाधानकारक उत्तर न देता पदस्थापना करण्यात आली. इतर तालुक्यांमध्ये पदवीधर सेवा जेष्ठ शिक्षकांनुसारच शासन निर्णयाप्रमाणे अतिरिक्त समायोजन करण्यात आले. मात्र मोहाडी पंचायत समिती येथील गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या मनमर्जीचे नियम लाऊन शासन निर्णयाची अवहेलना करून सेवेने कनिष्ठ शिक्षकाचे समायोजन केले आहे.

नियमबाह्य समायोजन लपविण्यासाठी म्हणून पाच वाजेपर्यंत चाललेली कार्यशाळा संपताच शनिवारी कार्यालय बंद असतानाही सदर आदेश व्हाट्सअप वर देऊन शिक्षकांना मोकळे करण्याची कार्यवाही घाईघाईत करण्याचे नेमके कारण काय? याबाबत अन्यायग्रस्त शिक्षकांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना याद्वारे विनंती केलेली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता सदर शिक्षकाला न्याय देण्यात यावा. असे आव्हान अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा भंडारा यांनी केले आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.


Spread the love

Related posts

ऑनलाई गेमच्या जाहिरात करणं सचिननं थांबावावं अन्यथा भारतरत्न परत करावं! बच्चू कडू

news

शिष्यवृत्ती परिक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे घवघवीत यश

news

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश! राज्यसरकारचा निर्णय

news

Leave a Comment