स्टोरी

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. नितीन ठाकरे यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क | पनवेल | जितिन शेट्टी : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. नितीन ठाकरे यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि जनसामान्यांमध्ये विश्वासार्ह प्रतिमा निर्माण करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. नितीन ठाकरे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्या सेवाकाळात मा. ठाकरे यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे तसेच नागरिकाभिमुख पोलीसिंगला प्राधान्य देत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि कार्यतत्परतेमुळे पोलीस विभागात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीची दखल घेत राज्य शासनाने त्यांच्यावर सहाय्यक पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली असून, ही पदोन्नती त्यांच्या निष्ठावान सेवेला मिळालेली योग्य पावती मानली जात आहे.
महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने मा. नितीन ठाकरे सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी उत्तम आरोग्य, यश आणि उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिक सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि लोकाभिमुख प्रशासन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

💐 हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐


Spread the love

Related posts

व्यंकटेश्वर {बालाजी} मंदिराचा ब्रम्होत्सव मोठ्या भक्तीभावाने संपन्न …..

news

महाराष्ट्रातील सर्व कारागृहांची एकूण कैद्यांची क्षमता २४ हजार आणि कैदी ४२ हजार! अमिताभ गुप्ता

news

गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

news

Leave a Comment