क्राईमस्टोरी

ठाणे: हिरानंदनीतील रिकी’स बार अन् किचनमध्ये अवैध धंदा खुलेआम!

Spread the love

कासारवडवली पोलिस स्टेशन हद्दीत उच्च न्यायालयाची नोटीस डावलून अल्पवयीन मुलांना दारू पुरवण्याचा प्रकार

ठाणे | महाराष्ट्र न्यूज  : हिरानंदनी येथील रिकी’स बार अँड किचनचे मालक रिकी किशनानी यांचा अवैध धंदा सुसाट चालू असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फुटपाथवर टेबल लावून ग्राहकांसह अल्पवयीन मुला-मुलींना दारू पुरवण्याचा आरोप या बारवर आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाने नोटीस बजावूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे, या अवैध कारभाराविषयी सत्य उघड करणाऱ्या पत्रकारांविरुद्ध रिकी किशनानी यांनी कासारवडवली पोलिस स्टेशनमध्ये खोट्या खंडणीच्या तक्रारी दाखल केल्याचे समजते. यामुळे “पोलिस पत्रकारांच्या बाजूने की अवैध धंदे करणाऱ्यांच्या बाजूने काम करतात?” असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.महाराष्ट्र न्यूजने ठाणे पोलिस आयुक्त अशितोष डुंबरे यांच्याकडे त्वरित लक्ष घालून या अवैध बारवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या नोटिसीचा अवमान आणि अल्पवयीनांवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Spread the love

Related posts

लहान मुलांना खोकल्यासाठी देण्यात येणाऱ्या सिरपचा नशेसाठी वापर! एन. डी. पी. एस. पथकाची कारवाई

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ कुडाळ युवासेना आक्रमक….!

news

पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक किट वाटप समारंभाचे आयोजन.

news

Leave a Comment