स्टोरी

कोकण रेल्वे मार्गावरील २४ तासानंतर हि पूर्वपदावर नाहीच.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक दि. १४ जुलै सायंकाळी मातीचा भराव रुळावर कोसळून ठप्प झालेली रेल्वे वाहतूक २४ तासानंतर हि पूर्वपदावर आलेली नाही. मुसळधार पावसामुळे रात्रीच्या सुमारास दरडही कोसळली. एक पोकलेन, जेसीबी व अन्य साधन साधनसामुग्री तसेच १००हुन अधिक कामगार यांच्या सहाय्याने दरड व मातीचा भराव हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. यावेळी एकूण १५ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून यात वंदे भारत एक्सप्रेस समावेश आहे. २० रेल्वे गाड्या अन्य मार्गे वळवण्यात आल्या आहेत. चार ते पाच एक्सप्रेस गाड्या त्या त्या स्थानकात थांबवण्यात आल्या असून प्रवाशांचे हाल झाले आहेत.


Spread the love

Related posts

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज बालदिनानिमित्त तमाम बालकांना दिल्या शुभेच्छा

news

सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या शिरोडकर यांचे निधन…!

news

विजयदुर्ग गडाजवळील आरमार गोदी अधिग्रहित करून शासनाने विकास करावा ! अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

news

Leave a Comment