स्टोरीक्राईम

पनवेलमध्ये अश्लील नृत्याचा धुमाकूळ : स्वराज्यभूमीवर अनैतिकतेची साजिश?

Spread the love

पनवेल (रायगड) : शिवछत्रपती महाराजांच्या पवित्र स्वराज्यभूमीवर पनवेल तालुक्यातील एका गावात नटराज लाईव्ह ऑर्केस्ट्रा अँड डान्स बार मध्ये रोज रात्री उशिरापर्यंत अश्लील नृत्याचा घाणेरडा प्रकार सुरू असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. ग्राहकांसमोर महिलांकडून खुलेपणे अश्लीलता दाखवली जात असून, ‘पैसे की बारिश’ उडवण्याचा प्रकार घडत असल्याची तक्रार आहे.स्थानीय नागरिकांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बारमध्ये उघड उघड अनैतिक कारवाया सुरू असतानाही पोलिस प्रशासन पूर्णपणे मोडून बसले आहे. यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.समाजिक कार्यकर्ते हाजी शाहनवाज खान (नो ड्रग्स & नो अल्कोहल, नवी मुंबई) यांनी या प्रकाराची तीव्र निंदा करताना म्हटले, “रायगड ही पावन भूमी अश्लीलता आणि अवैध कारवायांचे अड्डे बनवता येणार नाही. तत्काळ या बारचा परवाना रद्द करून कठोर कारवाई व्हावी.”हा प्रकार केवळ नैतिकतेच्या घसरगुंडीचेच दर्शन घडवत नाही तर कायद्याच्या अंमलबजावणीतील ढिलाईवरही गंभीर प्रश्न उपस्थित करतो. पोलिस प्रशासन आता किती काळ मौन बाळगणार? सर्वांचे लक्ष आता पोलिसांच्या भूमिकेकडे लागले आहे.


Spread the love

Related posts

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ची सन २०६६ ची निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार!

news

कालावल खाडीपात्रा मध्ये होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खलना बाबत मर्डे ग्रामपंचायत चे मालवण तहसीलदाराना निवेदन….

news

Leave a Comment