स्टोरी

चराठा गावठणवाडी येथील अरुण धोंडू परब यांच्या घरावर माड कोसळून घराचे नुकसान.

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: चराठा गावठणवाडी येथील अरुण धोंडू परब यांच्या घरावर माड कोसळून घराच्या छपरासह आतील वस्तूंचे सुमारे १,४७,५०० रुपयांचे नुकसान झाले. या घटनेच्या वेळी चिमुकल्यासह त्याची आई होती मात्र सुदैवानेच दुर्घटना टळली. हा माड कोसळताना मोठा आवाज आल्याने शेजारी धाऊन आले. मात्र कोणताही अनर्थ न घडल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेच्या वेळी घरात सौ दिप्ती अनिकेत परब आणि त्यांचा अडीच वर्षाचा कु. अर्श परब हा मुलगा होता. मात्र दैव बलवत्तर म्हणून मायलेक बचावले.

पूर्ण माडच घरावर कोसळल्यामुळे लोखंडी छप्पर नादुरुस्त झाले तर सिमेंटचे पत्रे फूटले. तसेच भिंतीना भेगा पडून भिंती कमकुवत बनल्या. तसेच एका खोलीत असलेल्या पेप्सी बनवण्याचे डीप फ्रीज आणि हर्डनर यांचा चक्काचूर झाला. नुकसानीचा पंचनामा तलाठी श्री आव्हाड यांनी केला. यावेळी माजी सरपंच बाळू वाळके, पोलिस पाटील सचिन परब, कोतवाल सुप्रिया परब आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सावंतवाडीत होणार मडकईकर यांच्या मालवणी कवितांचा जागर….

news

आपला भारत देश एक गाणं असेल तर RSS त्या गाण्याचे सरगम आहे! गायक शंकर महादेवन

news

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अविवेकी पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार ! सनातन संस्था

news

Leave a Comment