स्टोरी

पुरवठा अधिकारी दिपाली गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांना भेटवस्तू वाटप.

Spread the love

सावंतवाडी (रवी जाधव): साहस प्रतिष्ठान दिव्यांग मुलांसमवेत पुरवठा अधिकारी दिपाली गोटे यांनी मुलांना भेटवस्तू देऊन आपला वाढदिवस साजरा केला. पुरवठा अधिकारी दिपाली गोटे या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यास प्रेरित होऊन संस्थेच्या अनेक सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभाग दर्शवतात. त्या सावंतवाडी तहसीलदार कार्यालय पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांनी साहस प्रतिष्ठान दिव्यांग मुलांन सोबत आपला वाढदिवस साजरा करून त्यांना शालेयपयोगी वस्तू देऊन समाजाला एक संदेश दिला आहे. सामाजिक कार्यामध्ये आवड असल्यामुळे त्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमात नेहमी सहभाग घेतात. या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव,रूपा मुद्राळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी नंदकिशोर गंगाराम कोंडीये, शिक्षक द्रोपती राऊळ,विदिशा सावंत पालक तनया भोगण व गुंजन गावडे उपस्थित होत्या.


Spread the love

Related posts

माणगांवच्या श्री. वा. स. वाचनालयात महिला दिन साजरा.

news

विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्या कडून तिरवडेत काजू युनिटची पाहणी!

news

‘रक्तसंबंधातील नाती’ स्पष्ट करण्याची मनोज जरांगे पाटील यांची नवी मागणी…!

news

Leave a Comment