स्टोरी

विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्या कडून तिरवडेत काजू युनिटची पाहणी!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणेचे श्री. अंकुश माने  यानी मालवण तालुक्यातील तिरवडे येथील श्रीमती सरिता संतोष शिंदे यांच्या काजू युनिटला शुक्रवारी भेट  दिली. तसेच काजू प्रक्रिया युनिटची पाहणी करून माहिती घेतली.  श्रीमती सरिता शिंदे यांनी कृषी विभागातील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना (पी एम एफ एम ई) योजनेचा लाभ घेऊन हे युनिट चालू केल्याची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी PMFME योजना जिल्हा समन्वयक श्री. जबाक मालदार आणि कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी मालवणी यांनी आपल्याला या योजनेची परिपूर्ण माहिती देऊन तसेच सर्व प्रकारचे सहकार्य करून  हे युनिट उभारण्यासाठी मदत केली अशी माहिती दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी  श्री संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग श्री.दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. ओहोळ , तालुका कृषी अधिकारी श्री.व्ही.जी.गोसावी कृषी पर्यवेक्षक धामापूर श्री. एस.जी. परब,  कृषी सहाय्यक श्री.पवनकुमार सौंगडे, लाभार्थी तसेच शेतकरी उपस्थित होते.  तालुका कृषी अधिकारी मालवण श्री. विश्वनाथ गोसावि यांनी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.फोटो: तिरवडे येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजने मधून उभारलेल्या काजू युनिटची पाहणी करताना विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणेचे श्री. अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग श्री.दिवेकर, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी व अन्यछाया: पेडणेकर


Spread the love

Related posts

यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांचा मुणगेत समाजोपयोगी उपक्रम!

news

पुरातत्त्व खात्याच्या निरीक्षणानुसार श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत असल्याने मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करा ! – देवीभक्त सकल हिंदू समाजाची मागणी

news

बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेच्यावतीने प्राथमिक शाळेतील सर्व १६६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

Leave a Comment