स्टोरी

सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण आयोजित महिलांकरिता विविध व्यावसायिक तांत्रिक आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षणाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

सावंतवाडी( रवी जाधव): सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण आयोजित युवती व महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणावर आधारित सावंतवाडी नगरपरिषद सावंतवाडी यांच्यावतीने महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन काल सायंकाळी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या हस्ते झालं याप्रसंगी सभापती मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, सुनीता पेडणेकर, शर्वरी धारगळकर स्नेहा नाईक व नगरपालिका कर्मचारी परविन शेख उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून अल्पशा दरात प्रशिक्षणाची सुवर्णसंधी येथील युवती व महिलांना मिळाले आहे. यामध्ये कॅटरिंग प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंग,जुदो कराटे,संगणक प्रशिक्षण, टू व्हीलर व फोर व्हीलर प्रशिक्षण या प्रशिक्षणाला देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाला युवती व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे. सदर प्रशिक्षणाची सुवर्णसंधी मिळून देणाऱ्या नगराध्यक्ष श्रद्धा भोसले आणि नगरसेविका तसेच नगरपरिषद कर्मचारी यांचे येथील युवती व महिलांनी मनःपूर्वक आभार मानले आहे.


Spread the love

Related posts

मंत्री विजयकुमार गावित यांना महिला आयोगाची नोटीस !

news

कालावल खाडीपात्रा मध्ये होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खलना बाबत मर्डे ग्रामपंचायत चे मालवण तहसीलदाराना निवेदन….

news

शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात “एक दिवस बंधारयासाठी” हा उपक्रमाचे आयोजन.

news

Leave a Comment