स्टोरी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्यच्या सिंधुदुर्ग चित्रपट सेना अध्यक्षपदी गजेंद्र कोठावळे यांची नियुक्ती.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली. सावंतवाडी राजवाडा येथे माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री गजेंद्र शाम कोठावळे यांची सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष (राजे प्रतिष्ठान चित्रपट संघटना) पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली.ही नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री संतोष तळवणेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून जाहीर करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ कलाकार व लेखक चंद्रहास राऊळ यांची सचिवपदी, जय गणेश विष्णू गावकर यांची उपाध्यक्षपदी, प्राजक्ता परशुराम मोरजकर यांची महिला अध्यक्षपदी, सुशील तानाजी बिर्जे यांची तालुकाध्यक्षपदी, मनाली मनोज राऊत यांची महिला शहर अध्यक्षपदी, रुचिता रामदास आईर यांची सल्लागारपदी तसेच हेमांगी प्रवीण माने, सुरेखा दासू पवार, नीलम राजन कुंभार, सुमित सुधीर नाईक आणि रसिका रामदास आईर यांची सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली.या सोहळ्यास सावंतवाडीचे नगरसेवक श्री सुधीर आरिवडेकर, श्री बबन साळगावकर, श्री नारायण सावंत तसेच शिक्षक, पालक, महिला मंडळाच्या सदस्या, विविध पुरस्कारार्थी आणि राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात सन्मान, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. श्री गजेंद्र शाम कोठावळे यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक, चित्रपट आणि कामगार क्षेत्राला नवी दिशा व बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


Spread the love

Related posts

कणकवली कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव सुरु…!

news

अवैध व्‍यवसायांमध्‍ये कुणालाही पाठीशी घालणार नाही! उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

news

वायंगवडे येथे श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन… “

news

Leave a Comment