स्टोरी

बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या घावनळे येथील तुकाराम म्हापणकर या वृद्धाला सामाजिक बांधिलकीचा आधार…!

Spread the love

सावंतवाडी:                                                घावनळे येथील तुकाराम म्हापणकर गेले चार-पाच दिवस सावंतवाडी शहरांमध्ये निराधार अवस्थेत भटकत होते. पोटाला अन्न पाणी नसल्याकारणाने ते काल रात्री जिमखाना जवळ पेशुद्ध अवस्थेत पडले होते. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी याची कल्पना सामाजिक बांधिलकी देताच रात्री ११ वाजता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व शेखर सुभेदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व सदर वृद्ध व्यक्तीला स्वच्छ करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे .यासाठी पोलीस बीट हवालदार प्रसाद कदम, गणेश खोरागडे, लखन पाटील व साहिल खरागडे यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर वृद्ध व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत.


Spread the love

Related posts

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचा १६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न.

news

रत्नागिरीत विजेवरच्या वाहनांच्या निर्मितीचा कारखाना चालू होणार! पालकमंत्री उदय सामंत

news

माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर यांनी अवयव दान करण्याचा निर्णय…..

news

Leave a Comment