स्टोरी

मिल मजदूर संघ आयोजित एनटीसी मिल कामगारांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर!

Spread the love

मुंबई: राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित एनटीसी मिल कामगारांनी ७ सप्टेंबर पासून आपल्या मिलच्या गेटवर आयोजित केलेल्या साखळी उपोषणाला २५ दिवस उलटून गेले.कामगारांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यात एनटीसी व्यवस्थापनाला अपयश आल्यानंतर, राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने साखळी उपोषणात गिरण्यांमधील “वॉच अँड वॉर्ड“चे कामगार उतरविण्याचे आवाहन करण्यातआले. त्याप्रमाणे चारही गिरण्यांमधील सर्व वॉच अँड वॉर्ड”चे कामगार आंदोलनात सहभागी झाले आहेत.त्यामुळे दिल्लीपासून मुंबई पर्यंतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.त्यातून गिरण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. कामगारनेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर,यांनी नव्या पदावर येताच दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन,एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.

मुंबईच्या चार तर महाराष्ट्राच्या अचलपूर,बार्शी मिळून केंद्र सरकारच्या आखत्यारीतील एनटीसीच्या राज्यातील ६ गिरण्या सन २००२ मधील कोविडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये बंद करण्यात आल्या.देशामधील एनटीसीच्या २३ गिरण्या याच कारणातून बंद आहेत. गेल्या पाच वर्षात गिरण्या चालू करण्यात आल्या नाहीत.कामगारांना गेल्या बारा महिन्यात एक छदामही पगार देण्यात आलेला नाही.उपासमारीचे जीवन जगणाऱ्या,कामगारांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे! कुणाच्या मुलाचे लग्न थांबले आहे तर कोणा कामगारांच्या मुलाचे शिक्षण थांबले आहे.या प्रश्नावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अनेक आंदोलने छेडण्यात आली.औद्योगिक न्यायालय तसेच हाय कोर्टाचे दार ठोठावण्यात आले.न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला.पण त्या निर्णयाची अद्याप व्यवस्थापनाने अंमलबजावणी केलेली नाही.

कामगारांना बसून पगार नको तर हाताला काम हवे आहे.तेव्हा या गिरणा चालू करण्यात याव्यात,12 महिन्याची उपासमार संपुष्टात आणावी ,गतवर्षाची ग्रॅच्युईटी इत्यादीची कायदेशीर देणी देण्याच्या यावी यासाठी एन टीसीच्या बंद (१)टाटा, (२)हंदू मिल क्रमांक पाच,(३)पोद्दार,(४)दिग्विजय या गिरण्यांमध्ये कामगारांद्वारे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.आज आंदोलनाचा २७ वा. दिवस आहे!सोमवारच्या साप्ताहिक साप्ताहिक बैठकीत या आंदोलनात एनटीसी मिल मधील वॉच अँड वॉर्डच्या कामगारांना सहभागी करून घेण्याचे आव्हान सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केले आणि वॉच अँड वॉर्डचे कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .


Spread the love

Related posts

कुंब्रल ग्रामपंचायत मार्फत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन!

news

जिल्हा काँग्रेस सचिव तथा सोशल मीडिया अध्यक्ष केतनकुमार गावडे यांच्या मागणीला यश.

news

चींदर येथील हेमांगी पंकज सोनावणे हिचे निधन…!

news

Leave a Comment