नवी मुंबई | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : तळोजा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेल नवनाथ इन लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वेश्या व्यवसाय चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ उडवणारी ही घटना कायद्याच्या सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी ठरली आहे.पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या या हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी संशयास्पद महिलांची ये-जा सातत्याने होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. येथे व्यावसायिक स्वरूपात देहव्यापार चालवला जात असल्याचे पुरावे मिळत आहेत. कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेच्या नाकावर टिचून अशा प्रकारची अवैध कारवाई चालू असणे हे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.या प्रकरणामुळे तळोजा परिसरातील कुटुंबे आणि तरुण पिढीच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाने छापा टाकून या प्रकाराला आळा बसवावा, अशी मागणी केली आहे.
पोलीस प्रशासनाने कधी होणार कारवाई?
ही बाब आता फक्त बातमी न राहता, तळोजा पोलिसांसमोर एक मोठी कसोटी बनली आहे. नागरिकांचे आरोग्य, नैतिकता आणि कायद्याचे पालन यासाठी तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
