स्टोरी

निळजे रेल्वे पूल: ३ दिवसांचे आश्वासन, १ वर्ष झाले तरी काम शून्य!

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

निळजे |सुधीर गुजर : केवळ तीन दिवस बंद ठेवून तीन महिन्यांत नवीन पूल बांधण्याचे आश्वासन देऊन प्रशासनाने निळजे रेल्वे पूल पाडला. मात्र, आज जवळपास एक वर्ष उलटूनही पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे परिसरातील लाखो नागरिक, चाकरमाने आणि विद्यार्थ्यांना दररोज प्रचंड गैरसोय आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.वाहतुकीचा वाढता भार आणि जुन्या पुलाची दुरवस्था लक्षात घेता हा पूल पाडण्यात आला होता. नागरिकांनी भविष्यातील सुविधेच्या आशेने गैरसोय स्वीकारली होती. मात्र, आश्वासनांचा पाऊस पडला तरी प्रत्यक्षात कामाची वीटही रचली गेली नाही.

नागरिकांचा संताप : दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “नेमके जबाबदार कोण?” असा प्रश्न आता जोर धरत आहे — प्रशासन, लोकप्रतिनिधी की कंत्राटदार?प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी युद्धपातळीवर काम सुरू करावे, अन्यथा जनतेचा रोष अधिक तीव्र होईल, अशी इशारादायक भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

वेळेचा अपव्यय थांबवा, पूल लवकर उभा करा!
निळजे पूल रखडपट्टी आता केवळ गैरसोय न राहता जनतेच्या धीराचा अंत पाहत आहे.


Spread the love

Related posts

मालवण शहरातील सुमारे ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते! माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर

news

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात दत्त जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रम! १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पारंपारिक रित्या संपन्न होणार दत्त जन्म सोहळा.

news

मसुरे देऊळवाडा शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न!

news

Leave a Comment