स्टोरी

मालवण शहरातील सुमारे ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते! माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर

Spread the love

मालवण: शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव लक्षात घेता त्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम आमच्या कालावधीत एका प्रणीमित्र संस्थेच्या माध्यमातून २०१७ ला घेण्यात आलं होती. परंतु काही कालावधिनंतर ही मोहीम थांबली होती. त्यानंतर दोन तीन वेळा याबाबत निविदा प्रक्रिया करण्यात आली, परंतु त्याच दरम्यान असलेला कोविड कालावधी मुळे निविदा प्राप्त होऊ शकल्या नव्हत्या. २०२१ मध्ये या निविदेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आणी हि मोहिम हाती घेऊन मालवण शहरातील सुमारे ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते. अशी माहिते माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे म्हंटल आहे. त्या मोहिमेमुळे काही प्रमाणात भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर उपाय योजना करता आली. परंतु पुढील काही वर्षे सातत्याने ही मोहीम सुरू ठेवणं आवश्यक होत, तर नक्कीच एक दिवस यावर कायमस्वरूपी उपाय योजना होऊ शकणारी होती. परंतु डिसेंबर २०२१ लोकप्रतिनिधिम्हणून आमचा कालावधी संपल्या नंतर या मोहिमेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आला. अजून नप निवडणूका झालेल्या नसल्याने गेले १८ महिने नप वर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. परंतु या कालावधीत स्वतःहून तर नाहीच पण आठ महिन्यापूर्वी लेखी कळवूनही या बाबत कुठलीही दखल मुख्य अधिकारी यांनी घेतलेलि नाही.

या मोहिमेत सातत्य ठेवल्या शिवाय याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार नाही. सध्या मोकाट कुत्रांच्या त्रासाबाबत अनेक तक्रारी माजी लोकप्रतिनिधी कडे येत आहेत. परंतु स्वतःच्या बदलीच्या प्रक्रियेत व्यस्त असणाऱ्या मुख्य अधिकारी यांना या अश्या कामाकडे बघायला सवड नाही असच खेदाने म्हणावे लागत आहे. पण त्याच बरोबर शहरातिल लोकांच्या सहनशीलतेचा अंत होण्याआधी ही मोहीम हाती घ्यावी अशी सूचनाही करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणार्‍या अनिल जयसिंघानी याची ३.४० कोटींची मालमत्ता जप्त!

news

सावंतवाडी दफन भूमीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली अनेकदा निवेदन देऊन सुद्धा नगरपालिकेचा दुर्लक्ष- कृष्णा लाखे 

news

चौथरा बांधकाम करताना गटार न काढल्यामुळे घराला धोका!

news

Leave a Comment