स्टोरी

मुंबईत गिरणी कामगारांना अधिकाधिक घरे उपलब्ध करण्याचा कालच्या बैठकीत मानस!

Spread the love

मुंबई: मुंबईत ज्या ज्या ठिकाणी गिरणी कामगारांच्या घरांसाठी रिक्त जागा उपलब्ध आहे, तेथे घरे उपलब्ध करून देण्याचा मानस, घराच्या प्रश्नावरील कालच्या आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल विधान परिषदेच्या दालनात आढावा बैठक पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराच्या प्रश्नावर मुख्य अप्पर गृहनिर्माण सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सचिवांची कमिटी नियुक्त केली होती.या कमिटीची तिसरी बैठक उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. बैठकीत १६ कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संक्रमण शिबिरातील घरे गिरणी कामगारांना! मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर उभारलेल्या इमारतींमध्ये केवळ गिरणी कामगारांना घरे मिळणे अपेक्षित होते, ही घरे उभारताना एक तृतियांश प्रमाणे तीन हिस्स्यापैकी म्हाडाला देण्यात आलेल्या एक तृतीयांश हिस्यात गिरणी कामगारांना घरे देताना राज्य सरकारने डिसी रुल अंतर्गत ५० टक्के घरे संक्रमण शिबिरासाठी राखीव ठेवण्याची तरतूद केली आहे. ती तरतूद दूर करून कामगारांना ती घरे देण्यात यावी,अशी कामगार संघटनी जोरदारपणे मागणी केली. या मागणीचा गांभीर्याने विचार केला जाईल आणि म्हाडाशी बोलून हा प्रश्न मार्गी लावला जाईल,असा महत्वपूर्ण निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जागांचे एकत्रीकरण बैठकीत कामगार संघटनांनी मुंबईतील गिरण्यांच्या जागांचे मुंबईतच एकत्रीकरण (Amalgamation) करण्याचा मुद्दा उपस्थित केला. मुंबईत इंडिया युनायटेड मिल क्रमांक ४ च्या जागेवर ६ गिरण्यातील कामगारांना घरे बांधण्याचा प्रस्ताव प्रस्तावित आहे.तर वेस्टर्न इंडिया मिलच्या जागेवर ६ खाजगी गिरण्यातील कामगारांना घरे बांधण्याचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. दोन्ही प्रस्तावाना मंजुरी मिळवून देण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गिरणी कामगारांना लवकरच मोठ्या संख्येने घरे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईमधील एनटीसी गिरण्यांच्या रिक्त जागेवर गिरणी कामगारांना घरांसाठी जागा मिळवणे,अथवा मिठाग्रहाची जागा गिरणी कामगारांना मिळवून देणे,मुंबईतील गिरण्यांच्या पुनर्वासन इमारतीत गिरणी कामगारांना घरे देणे आदी प्रश्नावर केंद्र सरकारशी रीतसर बोलणीकरून हा प्रश्न निकालात काढला जाईल,असेही कालच्या बैठकीत ठरले आहे. मुंबईतील बोरीवली खटाव आणि सेंच्युरी मिलच्या जागेवर घरे बांधण्याच्या प्रश्नावरही चर्चा झाली. बैठकीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस,गिरणी कामगार लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण,सर्व श्रमिक संघटनेचे काँ. विजय कुलकर्णी, गिरणी कामगार सेनेचे बाळ खवणेकर,संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे विवेकानंद बेलूसे,रमाकांत बने, एनटीसी कामगार संघटना असोसिएशनचे ऍड.बबन मोरे, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे आनंद मोरे, गिरणी कामगार सभेचे हरिनाथ तिवारी, मुंबई गिरणी कामगार युनियनचे‌‌ ऍड.अरुण निंबाळकर, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे राजेंद्र साळसकर आदी कामगार संघटनांच्या नेत्यांनी‌ बैठकीत भाग घेतला.


Spread the love

Related posts

यांत्रिक नौकांची मासेमारीसाठी मालवण किनारपट्टी नजिकच्या समुद्रात घुसखोरी

news

सावंतवाडी भटवाडी मोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले! मोटर सायकल चालक बाल बाल बचावला.

news

आडवली समर्थ गड येथे १० एप्रिल पासून स्वामी समर्थ जयंती उत्सव!

news

Leave a Comment