स्टोरी

पोषण आहाराची बिले जूनपासून थकली, महिला आचाऱ्यांवर उपासमारीची वेळ.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: जिल्हा परिषद तसेच माध्यमिक विभागातील इयत्ता आठवीपर्यंतच्या शालेय पोषण आहाराची बिले जून महिन्यापासून मिळालेली नाहीत. त्याचबरोबर पोषण आहार शिजवणाऱ्या महिला बचत गटांच्या बिलेही चार महिन्यांपासून प्रलंबित आहेत, त्यामुळे महिला आचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे, याकडे माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे लक्ष वेधले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, आत्माराम गावडे, बाबा काणेकर, विनेश गवस उपस्थित होते.

यावेळी पेडणेकर म्हणाले, जिल्ह्यातील अनेक शाळांचे पोषण आहाराचे बिल जूनपासून थकले आहे. शाळांना उधारीवर धान्य व साहित्य घ्यावे लागत आहे. महिला आचाऱ्यांना मानधन न मिळाल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी ही बिले तात्काळ मार्गी लावावीत.त्याचबरोबर शिक्षकांच्या होणाऱ्या नियुक्त्या या स्थानिक पातळीवर व्हाव्यात. बाहेरच्या जिल्ह्यातील शिक्षक रुजू होत नाहीत किंवा बदली करून जातात, त्यामुळे शाळा शिक्षकांविना राहतात. त्यामुळे शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक विचार करून लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘महाराष्ट्र परिचर्या परिषदे’चे विसर्जन!

news

ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी होणार.

news

किनारपट्टीच्या भागात लवकरच नौदलाचे ‘युनिट’ स्थापन होणार…! हरिकुमार, नौदलप्रमुख

news

Leave a Comment