स्टोरी

ओटवणेतील नाना गावकर, शंकर गावकर पिता पुत्र होणार पुरस्काराने सन्मानित.

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे गावचे ज्येष्ठ दशावतार कलावंत आना उर्फ नाना धोंडीराम गावकर आणि सध्या दशावतारात झांज वादक म्हणून कार्यरत असणारे त्यांचे सुपुत्र शंकर गावकर या दोन्ही पिता पुत्रांचा एकाच मंचावर मानाच्या पुरस्काराने सन्मान होणार आहे. नाना गावकर यांना कोंकण कला “जिवन गौरव” पुरस्कार तर शंकर गावकर याला “कोंकण रत्न” पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. कोंकण बुक ऑफ रेकॉर्ड यशस्वी फौंडेशन, सिंधुदुर्ग प्रस्तुत कोंकण कला साहित्य गौरव संमेलन या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्काराचे वितरण रविवारी ९ ऑगस्ट सकाळी ११ वाजता पत्रकार भवन ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

नाना गावकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दशावतार कलेसाठी वाहिले. खऱ्या अर्थाने ज्या कलाकारांनी ही कला जगली जोपासली आणि जिवंत ठेवली त्या मातब्बर जेष्ठ कलाकारामध्ये आना उर्फ नाना गावकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते त्यांनी ही कला जपलीच नाही तर त्यांनी अनेक कलाकार घडविले जे आज दशावतार क्षेत्रात आपला नावलौकिक करत आहेत ही कला साता समुद्रापार नेत आहेत. त्यांचे सुपुत्र शंकर गावकर दशावतार मध्ये झांझ वादक म्हणून कार्यरत आहेत आणि त्याच्या योगदाना बद्दल त्यालाही कोंकण रत्न पुरस्कार देवून त्याचा गौरव करण्यात येत आहे.या पुरस्काराने दशावतार कलेबरोबर ओटवणे गावच्या शिरपेचार मानाचा तुरा खोवला गेला असून पिता पुत्राच्या एकाच मंचावर होणाऱ्या या सन्मानाने या पुरस्काराला वेगळं महत्व प्राप्त झालं असून हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. या सन्माना बद्दल दोघांही बाप लेकावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Spread the love

Related posts

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भारतीय संरक्षण दलाची ताकद दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन!

news

नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य महोत्सवात मालवणी कवी प्रा. डॉ. नामदेव गवळी निमंत्रित..!

news

शालेय विविध उपक्रमांतील माता पालकांचे योगदान कौतुकास्पद!… महेश बागवे यांचे प्रतिपादन.

प्रसाद परब

Leave a Comment