स्टोरी

शालेय विविध उपक्रमांतील माता पालकांचे योगदान कौतुकास्पद!… महेश बागवे यांचे प्रतिपादन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, मसुरे देऊळवाडा शाळेत ‘निपुण माता पालक मेळावा’ तसेच संयुक्त पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिताराम लाकम, उपाध्यक्ष गणेश बागवे, विस्तार अधिकारी प्रशांत पारकर, महेश बागवे, अशोक बागवे, डॉ. मिठारी, संगीता तांबे, समिधा बागवे, प्रकाश राणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या माता गौरव गीताने आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत करून आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कु.अन्वी परब (इ.दुसरी) आणि कु.स्वराज बागवे (इ.तिसरी) यांनी आपल्या आईबद्दल कृतज्ञता भाषण केले. अन्नपूर्णा सन्मानाने सौ. अश्विनी सावंत व श्रीम. संपदा मेस्त्री यांना गौरविण्यात आले. प्रशालेच्या शिक्षिका श्रीम.कविता सापळे यांनी पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि समाजसेविका पंडिता रमाबाई रानडे यांची यशोगाथा आपल्या ओघवत्या वाणीत व्यक्त केली.

मेळाव्याच्या निमित्ताने निपुण मातांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुप्रिया मेस्त्री, समिधा मेस्त्री, दीपिका लाकम, सानिका आमडोसकर, सौम्या बांदेकर, विशाखा बागवे आणि अनिता सावंत यांनी महिला दिनावर आधारित सुबक रांगोळ्या रेखाटल्या. त्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरविण्यात आले. माता पालकांसाठी पारंपारिक महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती यावर आधारित पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सौम्या बांदेकर, समिधा मेस्त्री, सानिका आमडोसकर, प्रांजल परब, सुप्रिया मेस्त्री, राधिका मेस्त्री, प्रसन्ना मेस्त्री, प्राजक्ता परब, प्रेरणा बागवे, विशाखा बागवे, सेजल सावंत, मेघा बागवे, सानिका सावंत, भाग्यश्री खोत, प्रिया बागवे, संगिता मुळये यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्वांचा प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. निपुण महाराष्ट्र उपक्रमा अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध शालेय उपक्रमांमधून विशेष प्रभावी ठरलेल्या मातांची निपुण माता यशोगाथा सौ. ताम्हणकर मॅडम यांनी सादर केली. प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी युगा मेस्त्री आणि तिची आई सौ. समिधा मेस्त्री यांच्या यशाचा आलेख सर्वांसमोर मांडला. व्यासपीठावर उपस्थित मसुरे आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर मिठारी मॅडम यांनी स्पर्धा परीक्षेतील यश आणि उच्चशिक्षण याबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “उच्च शिक्षण घेताना मराठी माध्यमाची कुठेही अडचण येत नाही. जिल्हा परिषदेतून शिकलेले विद्यार्थी घवघवीत यश मिळवतात.” शिक्षण विभाग प्रतिनिधी आणि कोळंब केंद्राचे केंद्रप्रमुख पारकर सर यांनी मार्गदर्शन करताना शाळेत राबविल्या गेलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. अशोक बागवे यांनी मराठी शाळेमध्ये मुलांना शिकवण्याचे फायदे पालकांना पटवून दिले. याप्रसंगी महेश बागवे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात पाल्य आणि पालक यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये गीत गायन, नृत्याविष्कार, समुह नृत्याचे उत्स्फूर्तपणे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले. सर्व पालक,स्वयंपाकी आणि शिक्षकांच्या योग्य समन्वयाने, खेळीमेळीच्या वातावरणात महिला मेळावा आणि पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.


Spread the love

Related posts

कलंबिस्त आणि माडखोल पंचक्रोशीतील ९ गावातील शेतकरी शासनाच्या काजू पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित…!

news

पर्यावरणाशिवाय जगणे अशक्य!

news

हिंदु संत आणि संप्रदाय यांची बदनामी करणार्‍या ’महाराज’ चित्रपटावर तत्काळ बंदी घाला !

news

Leave a Comment