स्टोरी

श्री परब यांनी शूर वीर यौध्दे विठ्ठल सावंत यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: संपूर्ण देशात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पूर्ण झाला आहे. तर वंदे नमातरम या राष्ट्रगीताला दीडशे वर्ष होत आले आहे. या निमित्ताने स्वातंत्र्य काळात सन 1962 व सन 1965 या कालावधीत भारत चीन व भारत-पाक अशी दोन युद्ध झाली. या युद्धात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सैनिक सहभागी झाले होते. काहीजण शहीदही झालेत. या युद्धाला आज 64 वर्ष पूर्ण होत आले आहेत. या दोन्ही युद्धामध्ये सहभागी झालेल्या शूरवीर विजयी योद्धे यांचे आशीर्वाद भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेत देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिका बाबत असलेला आधार आणि प्रेम भावना त्यांनी दाखवून दिली. सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त पंचक्रोशीत या दोन युद्धामध्ये सहभाग घेतलेले शूर वीर यौध्दे विठ्ठल बाबाजी सावंत यांच्या निवासस्थानी श्री परब यांनी भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. अन हर घर तिरंगा अभियान अंतर्गत तिरंगा यात्रा निमित्ताने गौरव केला कलंबिस्त गाव घरटी सैनिकी गाथा सांगणारा गाव म्हणून ओळखला जातो या गावात जवळपास दोन युद्ध जिंकून येणारे वीर सैनिक जवळपास पाच ते सात जण आहेत. या अशा शूरवीर सैनिकांचा सन्मान त्यांची भेट घेऊन करण्याचा अनोखा उपक्रम श्री परब यांनी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राबवला. तिरंगा यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली. त्याचाच एक भाग म्हणून भाजप युवा नेते विशाल परब व हर घर तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी 10 ते 13 ऑगस्ट या कालावधीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात देश सेवा करणाऱ्या सैनिकांचा सन्मान त्यांचेआशीर्वाद घेणे अन त्यांच्या कार्याचा सन्मान करणे यानुसार सह्याद्री पट्ट्यातील सैनिकी गावाला श्री परम यांनी भेट दिली यावेळी भारत पाक भारत चीन या दोन युद्धात विजयी शूर योद्धे हा सन्मान मिळवलेले सैनिकांची भेट घेतली

यावेळी माजी सैनिक विठ्ठल सावंत यांच्याशी श्री परब यांनी संवाद साधला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळी सैनिक युद्धावर जात असताना भेट घेऊन तुम्ही सुरक्षित जा, काळजी करू नका असा धीर दिला होता. त्या वेळच्या दोन्ही युद्धाच्या आठवणी जाणून घेतल्या या वयातही या दोन युद्धात सहभाग घेतलेल्या या भागातील या शूर युद्धांचा निश्चितपणे या सर्वांना एकत्र आणून त्यांचा आगळावेगळा सन्मान सोहळा या गावातच आयोजित केला जाईल. असे श्री परब यांनी स्पष्ट केले. यावेळी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, भाजपचे आंबोली मंडल युवा मोर्चाचे अध्यक्ष विनेश तावडे, प्रवीण सावंत निखिल बिडये, रामचंद्र सावंत, सैनिक पतसंस्थेचे वसुली अधिकारी सिद्धी सावंत आधी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

आरोस – दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत श्रवण यंत्र वितरीत…!

news

कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक एनसीसी अधिकारी गोपाळ गवस यांचा सत्कार

news

अक्कलकोट येथील श्रीराम मंदिरात मंगल आरतीने श्रीरामांची पुजा…!

news

Leave a Comment