स्टोरी

दिव्यांग बांधवांना तहसीलदार कार्यालयाकडून सर्व ती मदत दिली जाईल…! तहसीलदार श्रीधर पाटील

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील जवळपास २२ दिव्यांग ना अंतोदय योजनेचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्ड वितरित करण्यात आली. तरी अजून कोणी दिव्यांग बांधव या योजनेपासून वंचित असतील तर त्यांना निश्चितपणे लाभ दिला जाईल. त्यांना ग्रामसभेच्या ठरावाची प्रतची आवश्यकता नाही. तहसीलदार कार्यालयाकडून सर्व ती मदत दिव्यांग बांधवांना दिली जाईल. असे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्पष्ट केले सावंतवाडी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल तहसीलदार श्रीधर पाटील यांचे विशेष कौतुक शाल व श्रीफळ व स्वामी समर्थांच्या फोटो भेट देत साई श्रद्धा दिव्यांग निराधार गरजू संघटनेच्या वतीने करण्यात आले.

यावेळी श्री पाटील यांनी दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्या दिव्यांग बांधवांचे वार्षिक उत्पन्न ५० हजाराच्या खाली असेल त्या सर्व दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहेत. अंत्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी आपले रेशन कार्ड काढून घ्यावे. त्यांना थेट लाभ दिला जाणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पुरवठा विभागाचे निरीक्षक कमलेश ठाकूर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष साबाजी सांवत यांनी श्रीधर पाटील यांचा सत्कार केला. तर यावेळी दिव्यांग संघटनेचे कोलगाव शाखेचे घनश्याम मेस्त्री, रसिका घोगळे, देवयानी राऊळ, शिल्पा जाधव, सोनंद कोचरेकर, मानसी राणे आधी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

अजित पवार गटातील आमदारांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची सभापतींकडे मागणी !

news

अखिल प्राथमिक शिक्षक संघातर्फे महिला दिन उत्साहात संपन्न.

प्रसाद परब

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाराप प्राथमिक केंद्र शाळा नं १ सभामंडपासाठी ५ लाख रु. निधी मंजूर

news

Leave a Comment