बेनगाव-माणगाव: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ व कुडाळ तालुका गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षा २०२६-२७ मध्ये माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय, बेनगाव-माणगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.इयत्ता आठवीच्या या परीक्षेत विद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेत प्रथम क्रमांक- कु.लक्षिता विशाल तोरगळे९० गुण द्वितीय क्रमांक- मैथिली दत्तात्रय पालव व कु असद अजमल शेख८८ गुण तृतीय क्रमांक -मैथीली महेश सावंत व कु. सुयश संजय धुरी८६ गुण तसेच परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये गुण मिळवत गणित विषयातील आपली गुणवत्ता सिद्ध केली.या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री सगुण धुरी, सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक यांनी तसेच मुख्याध्यापक श्री गोविंदराव साटम पालक शिक्षक समिती उपाध्यक्ष श्री सोमा कदम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. विद्यालयाच्या गणित शिक्षिका सौ वैदेही भोगले यांनी मार्गदर्शन केले..विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
previous post
