क्राईम

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाकडून गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी कारवाई..!

Spread the love

बांदा: राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाकडून आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जुना पत्रादेवी बांदा येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी कारवाई केली आहे. गोवा बनावटीची केल्याप्रकरणी ठाणे येथील रितेश प्रभू म्हात्रे (वय ३५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ४ लाख २४ हजार ८०० रूपयाच्या गोवा बनावटीच्या दारूसह गाडी असा एकूण १० लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इनोव्हा गाडीमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे विविध ब्रँडचे ३० बॉक्स आढळून आले. या प्रकरणी वाहनचालक आरोपी रितेश प्रभू म्हात्रे (वय ३५ वर्षे, रा. तुर्भे, ठाणे) यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क चे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागाचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्ग अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी, धनंजय साळुंखे, विवेक कदम, वाहन चालक संदीप कदम, तसेच जवान दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, सतीश चौगुले आणि अभिषेक खत्री आदींच्या पथकाकडून करण्यात आली.


Spread the love

Related posts

डॉ. दा. भ. पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या काही लोकांवर प्राणघातक हल्ला!

news

भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न ! आरोपीला पोलिसांनी केली अटक….

news

श्रीरामजन्मभूमीवर जिहादी आतंकवादाचे संकट !

news

Leave a Comment