स्टोरी

मसुरे गावचे सुपुत्र रुपेश दुखंडे वारकऱ्यांच्या सेवेसी लीन..!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: पंढरपुरात जाऊन पांडुरंगा समोर नतमस्तक झाल्यावरच पांडुरंगाचा दर्शन होतं असे जरी असले तरी पंढरपुरात जाणाऱ्या वारीतील वारकऱ्यांच्या सेवेतही प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन होते. चालत चालत जाऊन थकलेल्या पायांची सेवा केल्यास खरे पुण्य मिळते याचेच मनात भान ठेवून मसुरे मागवणे वाडी येथील सुपुत्र रुपेश काशीराम दुखंडे आणि तो संस्थापक असलेले भराडी देवी सेवा मंडळ दिवा यांच्या वतीने सलग चौथ्या वर्षी सासवड पुणे येथे पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारीतील वारकऱ्यांना भेटून त्यांची सेवा आणि त्यांना मोफत अल्पोपहार देऊन एक अनोखा उपक्रम नुकताच राबविला आहे.

जीवनातला एक दिवस त्या चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची काहीतरी सेवा करावी हा विचार मनामध्ये घेऊन मसुरे मागवणे येथील सुपुत्र रुपेश काशिराम दुखंडे आणि तो ज्या संस्थेचा संस्थापक आहे त्या भराडी देवी सेवा मंडळ दिवा या संस्थेच्या वतीने आणि त्यांचे सर्व सहकारी, मंडळाचे पदाधिकारी यांनी सासवड पुणे येथे जाऊन वारीतील सर्व वारकऱ्यांना मंडळाच्या वतीने मोफत चहा, बिस्कीट, पाणी वाटप करून या सर्व वारकऱ्यांची यथोचित सेवा केली आणि विठू नामाच्या गजरात टाळ मृदुंगाच्या नादघोषात त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात. सलग चौथ्या वर्षी वारकऱ्यांची ही सेवा करण्याच्या अनोख्या उपक्रमास सर्व वारकऱ्यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी संस्थापक रुपेश दुखंडे या संस्थेचे अध्यक्ष कृष्णा चौगुले, सेक्रेटरी श्री अरविंद घोगळे, खजिनदार श्री देवेंद्र चव्हाण, अमोल दळवी, संभाजी कणसे, ओमकार चव्हाण, निखिल घाडी, शहाजी काबुगुडे, बलराज शिंदे, प्राजक्ता लाड, जागृती पानसरे मॅडम तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि सहकारी उपस्थित होते. रुपेश दुखंडेयांचे मसुरे गावासहित मुंबई दिवा येथे सामाजिक क्षेत्रातही नेहमी मोठे योगदान असते. वारकऱ्यांचे सेवा हीच खरी ईश्वर सेवा असे समजून आपण प्रतिवर्षी हा सेवात्मक कार्यक्रम आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने पार पाडत असतो आणि यापुढेही या कार्यक्रमात प्रतिवर्षी कोणताही खंड पडणार नाही असे यावेळी बोलताना रुपेश दुखंडे यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

धर्मांतराला प्रोत्साहन देणार्‍या अल्पंसख्यांकांसाठीच्या सरकारी योजना तात्काळ बंद करा !- अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय.

news

हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी १ ऑगस्ट रोजी कुडाळ येथे मोफत 2D इको तपासणी शिबीर!

news

भारत आखाती देशांशी थेट रेल्वे जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात….

news

Leave a Comment