स्टोरी

खुडी शाळेतील रान भाजी महोत्सवाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

मुणगे प्रतिनिधी: भाजी घ्या भाजी, ताजी ताजी रान भाजी, फोडशी, कुर्डू,अळू, शेवग्याचा पाला,पेवा, भारंगी,टाकळा,सुरण, कुड्याच्या शेंगा,फागली, १० रुपयाला २ जुड्या,,२० ला ४ जुड्या …. अशा असंख्य आरोळ्यांनी शनिवारच्या सकाळी खुडी शाळेचे प्रांगण दुमदुमून गेले होते. निमित्त होतं  रानभाजी महोत्सवाचे. त्यानिमित्ताने रानभाजी प्रदर्शन व विक्रीची दुकाने मांडण्यात आली होती. या भाज्या खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खुडी ता.देवगड येथील  खुडी शाळा नं १ या शाळेच्या वतीने शनिवार दि. १८  रोजी ‘ रानभाजी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते.मुलांनी  परिसरातील उपलब्ध विविध पालेभाज्या, रानभाज्या, गावठी भाज्या,इ.विकण्यासाठी दुकाने मांडली होती. खुडी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून  रानभाज्यांची मुलांकडून खरेदी केली.

आपली भाजी विकण्यासाठी मुलांची चाललेली धडपड पाहण्यासारखी होती. यातून मुलांना व्यवहारातील विविध संकल्पनांची ओळख होण्यास मदत झाली तसेच सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या ,अपरिचित रान भाज्या, रानभाज्यांचे पौष्टिक मूल्य व महत्त्व,कमीत कमी खर्चात उपलब्धता यांची विद्यार्थ्यांना माहिती मिळाली.यामध्ये मुळाभाजी, चवळीच्या पानाची भाजी,लालपाले भाजी, वालीच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, अळुची भाजी, नारळ, हिरवी केळी, पिकी केळी, पिठाचे लाडू, ईलाची फणस , मोहरीची पाले भाजी आदी रानभाज्या सदर महोत्सवात उपलब्ध होत्या.या भाज्या खरेदीसाठी ग्रामस्थांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी  जिल्हा परिषद सदस्य सुनिल पारकर, पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.खुडी सरपंच दिपक कदम, उपसरपंच  शशिकांत कावले, मिठबाव प्रभाग विस्तार अधिकारी सौ. प्रणाली मराठे, कोटकामते केंद्रप्रमुख सौ.कालिंदी माणगावकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमित जोईल शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. प्रेरणा घाडी  व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पोलीस पाटील सौ.मृण्मयी आरेकर ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनंत वायंगणकर ,मंगेश आरेकर, श्री.जगदाळे, श्री.कवर अंगणवाडी सेविका सौ.धुरी, सौ.पाडावे ,सौ.गुळेकर  यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. खुडी ग्रामपंचायत सदस्य,खुडी ग्रामस्थ व शाळेचे माजी विद्यार्थी यांनी महोत्सवास भेट देऊन शुभेच्छा दिल्या व खरेदी केली.  उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विनिता दुखंडे  पदवीधर शिक्षिका सौ.स्मिता कदम पदवीधर शिक्षक योगेश पाटील ,सहाय्यक शिक्षक विजय माने   यांनी उत्कृष्ट नियोजन केले.शाळा व्यवस्थापन समिती खुडी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Spread the love

Related posts

रक्ताचे दर कमी करा नाहीतर खुर्च्या खाली करा!जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचा जिल्हा रुग्णालयावर भव्य मोर्चा

news

इर्षाळवाडी दुर्घटना ग्रस्त व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

news

मालडी येथे श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिन १३ मे २०२३ रोजी

news

Leave a Comment