स्टोरी

खोटले येथे २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ धार्मिक आणि सामाजिक न्यास, खोटले (प्रस्तावित) यांच्या वतीने ‘श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचे आयोजन 20 मार्च रोजी करण्यात आले आहे. या निमित्त दिवसभर विविध धार्मिक विधी, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ​पहाटे ५.३० वाजता काकड आरती आणि नित्योपासनेने होणार असून, श्री. विजय परब (खोटले) यांच्याकडून हरिपाठ सादर केला जाईल. सकाळी ८.३० वाजता लघुरुद्र आणि स्वामींची अलंकार पूजा, सकाळी १०.०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होईल. दुपारी १२.३० वाजता महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद वाटप करण्यात येईल. दुपारी २.०० वाजता सुवासिनींसाठी कुंकूमार्चन सोहळा आयोजित केला आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ‘मोफत आरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला ‘महापालखी सोहळा’ दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत पार पडणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील नामवंत ढोलपथके, फुगडी नृत्य, चित्ररथ आणि दिंड्यांचा सहभाग असणार आहे.​सांस्कृतिक व कलाविष्कार:संध्याकाळी ७.०० वाजता कौतुक समारंभ व कलाविष्कार सादर केला जाईल, ज्यामध्ये कु. अवनीश उमेश देसाई (कळणे-दोडामार्ग) आणि कु. श्रेया समीर चांदरकर (कट्टा-मालवण) आपली कला सादर करतील. त्यानंतर ७.३० ते ९.०० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.रात्री ८.०० वाजता श्री सातेरी पुरांवतरी भजन मंडळ (कोनाळा-दोडामार्ग) यांचे भजन होईल. रात्री ९.०० वाजता श्री गजानन प्रा. भजन मंडळ (पुरळ, देवगड) आणि प्रसिद्ध गायिका सौ. साची मुळम यांचा गायनाचा कार्यक्रम होईल. उत्सवाचा समारोप रात्री १०.३० वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ (आरोस, सावंतवाडी) निर्मित ‘शिव मंगलागौरी’ या भव्य दशावतार नाटकाने होणार आहे.​”आपण यावे ही स्वामींची इच्छा!” असे आवाहन श्री स्वामी समर्थ उत्सव समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२०६८५७५२ / ८४३३९१२६५९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.


Spread the love

Related posts

प्रेमविवाहामुळे घटस्फोट वाढले! सर्वोच्च न्यायालय

news

झोळंबे येथे रक्त शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

news

वन विभागच्या चौकीवर झाड कोसळून आत असलेला कर्मचारी गंभीर जखमी

news

Leave a Comment