स्टोरी

वन विभागच्या चौकीवर झाड कोसळून आत असलेला कर्मचारी गंभीर जखमी

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी:आज झालेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहरा सर्वत्रच पाणी पाणी झालं होत. त्यातच नरेंद्र डोंगर येथे ड्युटी बजावत असणारा माजी सैनिक विद्याधर सावंत यांच्या चौकीवर झाड पडून आत असलेले सावंत हे कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना दुपारी एकच्या दरम्यान घडली. सदर कर्मचारी हा माजी सैनिक आहे. रक्ता रक्तबंबाळ अवस्थेमध्ये चौकीमध्ये अडकलेला असतानाच त्यांनी आपला सहकारी अशोक गावडे यांना फोन करून सदर घटनेची कल्पना दिली असता अशोक गावडे यांनी तेथे तात्काळ धाव घेतली व सावंत यांना चौकीमधून बाहेर काढले व आपला सहकारी उत्तम कदम यांच्या मदतीने सावंत यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयामध्ये दाखल केले. विद्याधर सावंत यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कुटीर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या मदत कार्यासाठी सामाजिक बांधिलकी रवी जाधव यांचे सहकार्य लाभले.


Spread the love

Related posts

‘प्रज्ञान’ रोव्हरचे काम इस्रोकडून बंद ! २२ सप्टेंबरनंतर रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची आशा !

news

मनसे लवकरच सासोली मधील भु माफिया पुढार्‍यांची पोलखोल ग्रामस्थाच्या मदतीने करणार मनसे स्टाईल ने..! उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ

news

आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारानी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ६ आणि अर्थ.

news

Leave a Comment