क्राईम

सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलीसांच्या ह्या ब्रीदवाक्याचा पोलीस कर्मचाऱ्यालाच विसर..!

Spread the love

अकोला (हमीद तडवी):अकोला मध्ये पोलीसाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ,हा पोलीस ज्या घरात भाड्याने राहत होता त्याच घरमालकाच्या मुलीसोबत ह्या पोलीसाने भयंकर कृत्य केल्याने या चिंतेत असलेल्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, या मुलीची प्रकृती गंभीर असुन ती मुलगी कोमात गेली आहे, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांनी गावकऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.सदरक्षणाय खलनिग्रहणाय महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे परंतु पोलीसांना याचा विसर पडला आहे,याची प्रचिती देणारी घटना अकोल्यातुन समोर आली आहेअकोल्याच्या बाळापुरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या मुलीवर बलात्कार केला आहे..या घटनेनंतर पीडीत मुलीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने तिचे प्राण वाचवत कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले.या मुलीची प्रकृती चिंताजनक असुन ती मुलगी सध्या कोमात आहे.दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ कुटुंबियांनी गावकऱ्यांसह पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले.पवन वडगावे या पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा द्यावी.अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.या प्रकरणात बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असुन हा पोलीस कर्मचारी तिथेच कार्यरत होता, त्यामुळे येथील पोलीसांनी पवन वडगावेला फरार करण्याची मदत केल्याचा आरोप पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.तर दुसरीकडे हा तपास स्थानिक पोलीसांकडुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची मागणी आहे..


Spread the love

Related posts

मालेगाव येथून ‘पी.एफ्.आय.’शी संलग्न असलेला संशयित कह्यात !

news

विजयदुर्ग-सावंतवाडी बसने प्रवास करणाऱ्या महिलेकडील पिशवी फाडून आतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोर फरार.

news

रत्नागिरीत पैशांच्या वादातून मैत्रिणीचा खून : आरोपीला जन्मठेप

news

Leave a Comment