स्टोरी

ओरोस, कसाल येथे आ. वैभव नाईक यांनी केली पूरस्थितीची पाहणी

Spread the love

आमदार वैभव नाईक स्वतः उतरले मदतीला…!

ओरोस: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरू असून ओरोस, कसाल येथे पूरस्थिती उद्भवली आहे.नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. याची माहिती मिळताच कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तातडीने याठिकाणी भेट देत पाहणी केली. घरात पाणी गेलेल्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व जेवणाची व्यवस्था करत त्यांना धीर देण्यात आला. त्यांना आवश्यक वस्तू पुरविण्याचे नियोजन केले. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर ओसरगाव येथे पुराच्या पाण्यात एका नागरिकाची चारचाकी गाडी अडकली होती. ही गाडी चालू करण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी प्रयत्न केले. मात्र गाडी बंद पडल्याने आ. वैभव नाईक यांनी स्वतः गाडी ढकलून ती पाण्याबाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले.


Spread the love

Related posts

हे सरकार तुमचं आमचं भल करण्यासाठी नाही तर तरुण वर्गाचा वाटोळं करण्यासाठी! योगेश धुरी

news

बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समिती, सावंतवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

प्रसाद परब

महिला शिवसेनेच्या वतीने ८ मार्चला महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे सावंतवाडीत आयोजन.

news

Leave a Comment