शिक्षण

मराठी ज्ञानपरंपरेचा जागर: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.

Spread the love

सिंधुदुर्ग (श्री. म. ल. देसाई): महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२५-२६’ मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ २३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथील मायनाक भंडारी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीम. प्रतिभा वरळे, शिक्षणतज्ज्ञ श्री, प्रविण शेवडे, महाराष्ट्र राज्य मराठी निश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य श्री. नामन पंडित, श्री. म ल. देसाई, डॉ. श्रीम. शरयू आसोतकर, श्रीम वृंदा कांचली तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रतिनिधी श्रीम. तांबे वांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सन २०२५-२६ मध्ये प्रथमच राज्यभर ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची परीक्षा दि. २९ मार्च २०२६ रोजी घेण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ९३ विद्याथ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. जिल्हास्तर व तालुकास्तरावरील महाराष्ट्र राज्य मराठी विडकोश निर्मिती मंडळामार्फत जिल्हा व तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसाठी रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आलीत. त्यानुसार जिल्हास्तरावर रु ३,०००, रु २,००० व रु १,००० तसेच तालुकास्तरावर अनुक्रमे रु १,०००, रु ७५० व रु ५०० इतकी रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यंदाच्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरावर शहरी व ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १० शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला घेतला होता. जिल्हास्तरावरील स्पर्धेत एकूण १० विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले असून त्यामध्ये शहरी विभागातील ४ व ग्रामीण विभागातील ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याप्रमाणेच तालुकास्तरावर ३९ विद्याथ्यांनी प्राविण्य मिळविले आहे.

जिल्हास्तरीय शहरी विभागातूनकुमारी, संगम तेजस्वी (राणी पार्वतीदेवी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी) यांनी प्रथम, कुमारी एकता तांडेल (भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मालवण) यांनी द्वितीय, कुमार अमेय आपटे (राणी पार्वतीदेवी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी) यांनी द्वितीय, तर कुमारी साक्षी गुरव (राणी पार्वतीदेवी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी) यांनी तृतीय क्रमांक मिळविला,जिल्हास्तरीय ग्रामीण विभागातूनकुमार सोहम टेंबुळकर (शंकर एम. विद्यालय, कुंभवडे) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. कुमारी अक्षया गोवेकर ने द्वितीय, कुमार नकील गुरुप्रसाद ने द्वितीय, सावंत रत्नदीप ने द्वितीय, (शंकर एम. विद्यालय, कुंभवडे) मिळवला. तसेच कुमारी सिया (श्री देनी शांतादुर्गा हायस्कूल, वाढाचापाट, मालवण) आणि कुमारी अश्वमी देसाई (कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळ) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

उपस्थित मान्यवर

यावेळी शिक्षणतज्ज्ञ श्री. प्रविण शेवडे यांनी “डिजिटल युगात मराठी भाषा आणि ज्ञानसंपदांचे जतन” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करताना मराठी भाषेची समृद्ध परंपरा, ज्ञानसंपदा आणि संदर्भग्रंधांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले, विद्यार्थ्यांनी डिजिटल साधनांचा अभ्यासासाठी सकारात्मक उपयोग करून वाचनाची सवय जोपासानी, विश्वकोशासारख्या संदर्भग्रंथांचा नियमित वापर करावा आणि मातृभाषेच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य श्री. म. ल. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या या पारितोषिक वितरण समारंभाचे कौतुक करत्त, मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वतंत्र सत्कार समारंभ आयोजित करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याचे गौरवोद्रार काढले, विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याची ही अभिनव संकल्पना इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे डॉ. श्रीम. शरयू आसोलकर, श्रीम वृंदा कांबळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मा. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून, आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि ज्ञानपरंपरेची वाहक असल्याचे सांगितले.

जागतिकीकरण आणि डिजिटल युगाच्या पार्श्वभूमीवर नव्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा दैनंदिन व्यवहारात, वाचन-लेखनात तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य, विश्वकोश, चरित्रग्रंथ आणि संदर्भग्रंथांचे नियमित वाचन करून ज्ञानसमृद्ध होण्याचा प्रयत्न करावा. मराठी भाषेचे संवर्धन व जतन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून नव्या पिढीने त्यासाठी पुढाकार प्यावा. यापुढे होणाऱ्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित ज्ञावर्धन स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग करावा याबाइलच्या सूचना त्यांनी जि.प शिक्षणाविभागाचे प्रतिनिधी यांना दिल्यात.


Spread the love

Related posts

स्वराली मुणगेकर शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत

news

ओवळीये गावचे सुपुत्र तथा सांगेली आणि दाणोली केंद्रप्रमुख गुंडू अर्जुन सावंत हे आपल्या ३६ वर्षे ७ महिन्यांच्या प्रदीर्घ आदर्श शैक्षणिक सेवेतून निवृत्त.

news

संदिप गावडे फाउंडेशनच्या वतीने चौथीसाठी यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२५ चे आयोजन.

news

Leave a Comment