शिक्षण

संदिप गावडे फाउंडेशनच्या वतीने चौथीसाठी यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२५ चे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: संदिप गावडे फाउंडेशनच्यावतीने सावंतवाडी तालुकास्तरीय मर्यादित फक्त चौथीसाठी यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२५ चे रविवार १६ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत आयोजन करण्यात आले आहे. ही शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा माडखोल केंद्रशाळा, सांगेली केंद्रशाळा, आंबोली सैनिक स्कूल, मळेवाड शाळा नं १, मळेवाड नं २, सावंतवाडी कळसुळकर हायस्कूल आणि बांदा केंद्रशाळा येथे होणार आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन संदीप गावडे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप गावडे, अध्यक्ष सुधीर गावडे, सचिव दत्ताराम सावंत यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

माडखोल केंद्राचा बाल कला – क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न….!

news

शिष्यवृत्ती परिक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे घवघवीत यश

news

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.पद्मनाभ पाटणकर चे सुयश.

news

Leave a Comment