स्टोरी

बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समिती, सावंतवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी(दीपक पटेकर): बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समिती, सावंतवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येत्या रविवारी दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता समाजमंदिर, सावंतवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरी जास्तीतजास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

रक्तदान महापुण्यदान” हे ब्रीद घेऊन ऑन कॉल रक्तदाते संस्था रक्तदान चळवळीत कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असते. लवकरच रक्तदात्यांसाठी गौरव सोहळा आयोजित करून रक्तदान चळवळीत संस्थेसोबत कार्यरत राहून रक्तदानाचे महान कार्य करणाऱ्या रक्तदात्यांचा मागील वर्षाप्रमाणे सामूहिक विमा उतरवला जाणार असून भेट वस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान देखील करण्यात येणार आहे.

दिनांक १२ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदानासाठी येऊ इच्छिणाऱ्या रक्तदात्यांनी श्री.जगदीश चव्हाण (9421148753), श्री. अनिल जाधव (9881822723), श्री. सगुण जाधव (7066409995)श्री. केशव जाधव (9403559972) सिद्धार्थ पराडकर (9422967249) सचिव श्री.बाबली गवंडे (8390905269) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

कळसुलकर प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.

news

चांद्रयान-३ चे १२ जुलै रोजी प्रक्षेपण होणार!

news

सावंतवाडी खासकीलवाडा येथे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची १६९ वी जयंती साजरी होणार!

news

Leave a Comment