स्टोरी

नितेश राणे यांची कॅबिनेट पदी वर्णी लागल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विकासकामांना गती मिळणार…! सौ रिद्धी परब

Spread the love

सिंधुदुर्ग: कणकवली विधानसभा मतदारसंघाचे डॅशिंग आमदार श्री नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांना सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत.

तसेच नितेश राणे यांची कॅबिनेट पदी वर्णी लागल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विकासकामांना गती मिळणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षा सौ रिद्धी रोहन परब यांनी व्यक्त केला.

आमदार नितेश राणे यांनी मागील दहा वर्षात आमदार असताना त्यांच्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे आमदार अशी त्यांची ओळख आहे, तसेच हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदू रक्षक बनून प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत, हिंदूरक्षणासाठी ते ह्याफुडे अजून जोमाने आणि ताकदीने काम करतील अशी राज्यातील प्रत्येक हिंदुना आशा आहे. नितेश राणेंच्या मंत्रीपदानें सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा रिद्धी परब यांनी दिली आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषधे उपलब्ध ! युवा रक्तदाता संघटना, सामाजिक बांधिलकी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या चळवळीला आणि मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाना यश.

news

गुंडू जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर .

news

सावंतवाडी तालुक्यातील चौकूळ केगदवाडी येथील पाण्याच्या तळीचे काम अपूर्ण….

news

Leave a Comment