स्टोरी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना शाखा – सिंधुदुर्गची ऐतिहासिक स्थापना.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: सध्याच्या बदलत्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि सामाजिक परिस्थितीत शिक्षकांसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे जनगणना, निवडणुका, विविध शासकीय सर्वेक्षणे, ऑनलाइन कामांचा वाढता बोजा आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आव्हान अशा दुहेरी जबाबदाऱ्या शिक्षकांवर पडत आहेत. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी मतभेद बाजूला ठेवत इतिहास घडविला आहे.जिल्ह्यात आजपर्यंत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेची अधिकृत शाखा अस्तित्वात नसल्यामुळे शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर एकसंघपणे भूमिका मांडताना अनेक अडचणी येत होत्या. विविध संघटना स्वतंत्रपणे कार्यरत असल्या तरी शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी एक सक्षम आणि प्रभावी व्यासपीठाची गरज सातत्याने जाणवत होती.याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र आले आणि शिक्षकांच्या हितासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेत “महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शाखा सिंधुदुर्ग” ची स्थापना केली. विशेष म्हणजे या नव्या शाखेला महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.या स्थापनेमुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना एक सक्षम, प्रभावी आणि संघर्षशील व्यासपीठ उपलब्ध झाले असून शिक्षकांच्या समस्या, शैक्षणिक प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या मुद्द्यांसाठी आता एकत्रित ताकद उभी राहणार आहे.नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व संघटनांच्या सर्वानुमते तडफदार, अभ्यासू आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेले श्री. संतोष पाताडे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने लढणारे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे.तसेच प्रशासनातील बारकावे, शासन निर्णयांची सखोल जाण आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबत असलेली संवेदनशीलता लक्षात घेऊन श्री. लक्ष्मण वळवी यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली. त्यांच्या अनुभवाचा संघटनेला मोठा लाभ होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या कार्यकारिणीत सन्मानपूर्वक स्थान देण्यात आले. विविध विचारप्रवाह, विविध संघटना आणि विविध नेतृत्व एकाच ध्येयाने – “शिक्षक, शिक्षण आणि विद्यार्थी हित” – या उद्दिष्टासाठी एकत्र आल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली :जिल्हाध्यक्ष : श्री. संतोष पाताडेजिल्हा सचिव : श्री. लक्ष्मण वळवीकार्याध्यक्ष : श्री. सुहास सावंतसहसचिव : श्री. गणेश नाईककोषाध्यक्ष : श्री. सचिन जाधव सल्लागार : श्री. म. ल . देसाईउपाध्यक्ष : श्री. शिवाजी पवारप्रसिद्धीप्रमुख : श्री. अमित ठाकूरउपाध्यक्ष : श्री. दिलीप मस्के उपाध्यक्ष : श्री. विकास वाडीकर उपाध्यक्ष : श्री. अमोल कांबळेकार्याध्यक्ष : श्री. विनायक हरकुळकर उपाध्यक्ष : श्री. सोमनाथ शेंगाळ सदस्य : श्री. संतोष पेंडणकर सल्लागार : श्री. ए डी राणेशिक्षकांना शैक्षणिक कामांव्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा, जनगणना व इतर प्रशासकीय कामांमुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, रिक्त पदे, सेवा विषयक प्रश्न, पदोन्नती, वेतन, निवृत्तीवेतन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांसारख्या विषयांवर ही संघटना आता प्रभावीपणे आवाज उठवणार आहे.या ऐतिहासिक बैठकीस महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर, केंद्र प्रमुख प्राथमिक शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, महाराष्ट्र प्राथमिक उर्दू शिक्षक संघटना, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक महासंघ, कस्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघटना महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य सत्यशोधक शिक्षक संघटना तसेच जिल्ह्यातील इतर विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व संघटनांनी शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना (महाराष्ट्र राज्य संलग्न) शाखा सिंधुदुर्गच्या स्थापनेला एकमुखी पाठिंबा दिला.

“संघर्षासाठी एकजूट, शिक्षणासाठी बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कटिबद्धता” हे ब्रीद घेऊन स्थापन झालेली ही शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक चळवळीला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.शिक्षकांच्या एकजुटीचा हा ऐतिहासिक क्षण केवळ संघटना स्थापनेपुरता मर्यादित नसून, तो सिंधुदुर्गच्या शैक्षणिक भविष्यासाठी उभा राहिलेला आशेचा नवा दीपस्तंभ असल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.”एक शिक्षक – एक आवाज – एक संघटना” या भावनेतून उभी राहिलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शाखा सिंधुदुर्ग, आगामी काळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.


Spread the love

Related posts

माजगावच्या ओंकार महापुरुष भजन मंडळाने निश्चय व इच्छा शक्तीच्या जोरावर योग्य नियोजन करून राज्यातील प्रसिद्ध चार मंदिरामध्ये भजन सेवा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण

news

कसल्याही आमिषाला बळी न पडता २० नोव्हेंबरला प्रत्येकाने प्रामाणिकपणे मतदानाचा हक्क बजवायचाच..! रवी जाधव

news

शीतपेय विक्रेत्‍यांकडून ‘कुलिंग चार्जेस’च्‍या नावाखाली ग्राहकांची लूट!

news

Leave a Comment