स्टोरी

सिंधुदुर्गाने मला भरभरून प्रेम दिलं..’! जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांचे उद्गार.

Spread the love

सावंतवाडी: सिंधुदुर्ग वासियांनी मला भरभरून प्रेम दिले. ही प्रेमाची शिदोरी घेऊनच माझी पुढची वाटचाल करत आहे. मी गेली साडेपाच वर्ष या जिल्ह्यात काम केले. पण कधीही शासकीय ग्रंथालयांचे नुकसान होईल असे काम माझ्या हातून घडले नाही आणि यापुढेही घडणार नाही.सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच काम करणे एवढेच मी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय ग्रंथालयांबद्दल काही अडीअडचणी समस्या असतील तर त्या मी निश्चितपणे माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करेल.असे मत जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी व्यक्त केले श्री हजारे यांची मुंबई ग्रंथालय संचालनालयामध्ये दुर्मिळ ग्रंथालय विभाग येथे ग्रंथालय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून रत्नागिरी येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक दीनानाथ नाईक यांच्याकडे प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून कार्यभार देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने कुडाळ येथील रा. ब अनंत शिवाजी देसाई वाचनालय च्या सभागृहात सत्कार स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठल पाटणकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ उपाध्यक्ष धाकु तानावडे उपाध्यक्ष रुजारियो पिंटो, रा. ब. अनंत वाचनालयाचे कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रभारी अधिकारी शशांक नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने श्री हजारे यांचा शाल व श्रीफळ व भेटवस्तू देऊनविठ्ठल पाटणकर यांच्या हस्तेसत्कार करण्यात आला तर नवीन प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक यांचा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री हजारे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा हा माझा आवडीचा जिल्हा आहे. मी हा जिल्हा खास मागून घेतला होता. गेली साडेपाच वर्षे या जिल्ह्यात काम करताना अनेक समस्या अडचणी उद्भवल्या. पण त्यावर मात करून मी जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून या जिल्ह्यात शासकीय ग्रंथालय अधिक गतीने अशी पुढे नेता येतील या दृष्टीने माझे सकारात्मक दृष्ट्या विचार करून मी ते काम करत राहिलो. हे काम करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय चळवळीतील संस्था चालक तसेच कर्मचारी वर्ग आणि या जिल्हावासीयांनी मला भरभरून प्रेम दिले हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. ग्रंथालयांचे नुकसान होता कामा नये. हाच दृष्टिकोन मी ठेवला आणि शासनाच्या नियमानुसारच मी काम करत राहिलो मुंबई ग्रंथालय संचालनालय मध्ये माझी बदली झाली आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या संदर्भात समस्या अडचणी जर माझ्यासमोर आल्या तर त्या मी निश्चितपणे सोडवे न अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा हा माझ्या परिचयाचा जिल्हा आहे.या जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ निश्चितपणे वाढवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय चळवळीत जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्याचा बदली झाल्यानंतर सन्मान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सचिन हजारे यांनी प्रामाणिक अधिकारी म्हणून आपली वेगळी छाप निर्माण केली होती. त्यामुळे सर्व जवळपास 118 ही ग्रंथालयांचे संस्था आणि कर्मचारी यांचे वेगळे नाते निर्माण झाले होते. श्री हजारे यांच्यासारखा चांगला अधिकारी या जिल्ह्याला मिळाला हे आमचे सर्वांचे भाग्य आहे. त्यांनी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सहकार्याने ग्रंथालय चळवळीचे दृष्टीने अनेक उपक्रम राबवले त्यांनी मुंबई ग्रंथालय संचालनामध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रंथालय चळवळीकडे विशेष लक्ष द्यावे. असे ते म्हणाले यावेळी संजय वेतुरेकर धाकु, तानावडे,महेश बोवलेकर, प्रवीण भोगटे, डॉ. विवेक पाटणकर, सौ प्रतिभा पाटणकर,संजय शिंदे शिवानंद प्रभू देवदत्त चुबे, सिताराम परब, श्री सदानंदतावडे आदींनी वाचन मंदिरांजे पवित्र राखण्याचे काम शासकीय अधिकारी म्हणून सचिन हजारे यांनी केले. माणसातला माणूस कसा असावा? हे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातून दाखवून दिले. एक शांत संयमी असे अधिकारी या जिल्ह्याला लाभलेशासकीय ग्रंथालय पुरस्कार साठी नेहमीच जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना एक प्रोत्साहन आणि सहकार्य करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये होती. असे चांगले अधिकारी लाभल्यामुळेच ग्रंथालय चळवळ अधिक बळकट झाली. असे मत व्यक्त केले.

यावेळी सहकार्यवाह श्री. महेश बोवलेकर, कार्यकारिणी सदस्य अड. संतोष सावंत, सतीश गावाडे, गुरूंनाथ मडवळ, जयेंद्र तळेकर, प्राविण भोगटे प्रसाद दळवी दीक्षा परब संजय वेतुरेकर, संजय शिंदे जिल्हा ग्रंथालयाचे कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर, सदस्य श्री. विजय भोगटे, श्री. देवदत्त चुबे, श्री. तावडे सौ. प्रतिभा पाटणकर, श्री. विठ्ठल पाटणकर, पूजा वेतुरेकर, विनिती कदम, कीर्ती परब, सिताराम परब, रामदास सावंत, प्रसाद दळवी, सिताराम परब, हेमांगी खोत, प्रिया पांचाळ, सदानंद तावडे, रश्मी कोरगावकर, प्रतीक्षा पाटणकर, उमा कुडाळकर, दीक्षा परब, बापू सावंत, मिनेश तळेकर आधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ यांनी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने संस्थाचालक आणि कर्मचारी वर्ग यांच्या माध्यमातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. ही पहिलीच वेळ आहे. ग्रंथालय चळवळ या जिल्ह्यात अधिक गतीने वाढत आहे. यावेळी सूत्रसंचालन आभारजिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ॲड संतोष सावंत यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्हा ग्रंथालय संघांचे पदाधिकारीसंचालक व ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

देशाचा एक चांगला नागरिक हा सुद्धा खरा देश सेवक असतो..! योगेंद्रसिंग यादव

news

सरकारच्या नाकर्तेपणामुळे तळवडे-नेमळे रस्त्याचे काम रखडले…! केतनकुमार गावडे

news

बांदिवडे येथे १० मे रोजी रंगणार ‘नको जाळूस घरटे माझे’ नाटकाचा प्रयोग!.

प्रसाद परब

Leave a Comment