स्टोरी

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे म्हणजे माणूसपणाची जाणीव असलेले उत्कृष्ट अधिकारी..! संजय शिंदे

Spread the love

मुणगे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयातील ग्रंथालय कर्मचारी किंवा ग्रंथालय कार्यकर्तेही यांच्याशी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे साहेब यानी अधिकारपणा कधीही दाखविला नाही. ग्रंथालय बाबत असणाऱ्या समस्था अडचणी शांतपणे समजावून सांगणे हा त्यांचा माणूसपणाचा गुणधर्म होता असे मत सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ. सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय शिंदे यानी व्यक्त केले. ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांच्या सन्मान सोहळ्यातून अध्यक्ष पदावरून बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांची बदली ग्रंथालय संचालनालय नगरभवन मुंबई येथे व त्यांच कार्यालयातील वरिष्ठ लिपिक किशोर कांबळे यांची बदली सातरा येथे झाली असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्यावतीनेश्री देव रवळनाथ रंगमंच ओरोस बु. सिंधुदुर्गनगरी  येथे काल ता. ६ रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, वरिष्ठ लिपिक किशोर कांबळे, सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय शिंदे, ओरोस वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश जैतापकर , पाटणकर वाचनालय कुडाळच्या अध्यक्षा सौ प्रतिभा पाटणकर ,रमेश बोन्द्रे,पुनम नाईक, कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष अनिल शिवडावकर , कार्यवाह महेंद्र पटेल,तसेच ऋतूजा केळकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री शिंदे पुढे म्हणाले कि,सचिन हजारे साहेब सिंधुदुर्ग जिल्हात सन्-2020 पासून कार्यभार स्विकारल्या पासून जिल्ह्यातील ग्रंथालयाना अधिक बळकटी मिळाली सन् 2021-22 मध्ये कोरानो सारख्या काळामध्ये साहेबांनी जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयाना वेळोवेळी मार्गदर्शन करून ग्रंथालयाचे अनुदान कट होणार नाही याबाबतची काळजी घेतली  ग्रंथालयातील कर्मचाऱ्यां सोबत साहेब नेहमी मित्राप्रमाणे वागत असत एवढ्या मोठ्या पदावर असून कोणत्याही ग्रंथालय कर्मचाऱ्यांने साहेबांना फोन केला तर साहेब त्या कर्मचाऱ्यास शांतपणे त्याच्या समस्या सोडवत असत एखादेवेळी साहेब मिटींगमध्ये असले तर मिटिंग संपल्यावर साहेब आलेल्या नंबरवर फोन करतात असा कुठल्याही अधिकारी नाही कि ग्रंथालय कर्मचाऱ्यांना स्वतः फोन करून समस्या सोडविली परंतु हजारे साहेब अपवाद आहेत. त्यांचेजवळ असणारी माणुसकी ,प्रेम तसेच सर्वाशी असणारे सलोख्याचे संबंध आणि सहकार्य यामुळे साहेब आमच्या ह्रदयात आहेत असे शिंदे यानी सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पुनम नाईक यानी सांगितले की.हजारे साहेब आमच्याशी कधीही अधिकाऱ्यांसारखे वाडले नाहीत. कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून समस्थातून मार्ग कसा काठता येईल ते बघीतले आँनलाईन वार्षिक अहवाल म्हणा किंला आँनलाईन अंकजक्षण अहवाल पाठविण्याची सुरूवात झाली त्यावेळी बऱ्यास ग्रंथालयाना येणाऱ्या अडचणी बाबत स्वतः फोन करून मार्गदर्शन करीत असत. साहेबद्दल बोलायला शब्दच अपुरे पडतात. अशी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांची बदली ग्रंथालय संचालनालय, नगरभवन मुंबई आणि वरिष्ठ लिपिक किशोर कांबळी यांची बदली सातारा येथे झाली असल्याने सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष  संजय शिंदे यांचे हस्ते दोघांचाही शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी रामेश्वर वाचन मंदिर आचराच्या ग्रंथपाल  सौ.विनिता कांबळी, ओरोस ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ.नेहा कशाळीकर, अनिल देवळे, उमाबाई बर्वे ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रशांत बांदकर  तसेच ग्रंथालय पदाधिकारी व कार्यकर्ते सौ प्रतिभा पाटणकर,रमेश बोन्द्रे, सुशिल निब्रे,श्री सकपाळ यानी श्री हजारे साहेब याच्या बद्दल मनोगताततून साहेबा बद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त केली.

सचिन हजारे यानी आपल्या सन्मानाला उत्तर देताना सांगितले की,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ समृध्द आहे . जिल्ह्यात प्रथमच आल्यानंतर वाटायचे कि याठिकाणी कसे लोक असणार. याबाबत माझ्या मनात असणारी शंका पुसून टाकली. येथील ग्रंथालय पदाधिकारी आणि कर्मचारी यानी मला आपलेसे करून घेतले. जिल्ह्यातील ग्रंथालयाचे पदाधिकारी म्हणा किंवा ग्रंथालय कर्मचारी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ पणे काम करताना दिसतात. ग्रंथालयाच्या तपासणी करिता गेल्यानंतर साहेबाना त्रास होणार नाही यांची काळजी त्यांच्याकडून घेतली जायची त्यामुळे अगोदरच सुचना दिलेल्या असल्यामुळे तपासणी करताना अगदी सोपी जायची.जिल्ह्या मध्ये ग्रंथोत्सव साजरा करताना जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे सहकार्य वेळोवेळी मिळत असायचे त्यामुळे माजी बदली झाली असली तरी आपले ऋणानुबंध संपणार नाहीत मी वरिष्ठ कार्यालयात असल्याने आपल्या काही समस्या असल्यास त्या तेथूनही सोडविण्याचा प्रयत्न करिन असे श्री हजारे यानी सांगितले.या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथालय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.                  

कार्यक्रमाचे सुत्रसंचालक ऋतूजा केळकर यानी केले. तर उपस्थित मान्यवर व ग्रंथालय कर्मचारी यांचे आभार संघाणे कार्यवाह महेंद्र पटेल यानी मानले.कृपया फोटोसह प्रसिद्ध करणेसिंधुदुर्गनगरी – येथील देव रवळनाथ रंगमंच ओरोस.बु.येथे सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी संचिन हजारे आणि त्याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिक किशोर कांबळी यांच्या झालेल्या प्रशासकिय बदली बद्दल त्यांचासन्मान करताना संजय शिंदे सोबत अनिल शिवडावकर, महेंद्र पटेल, तसेच किशोर कांबळी, सौ.प्रतिभा पाटणकर ,प्रकाश जैतापकर ,रमेश बोंन्द्रे,आदी मान्यवर


Spread the love

Related posts

कोकणाला ‘वेदर डिस्कम्फर्ट’ची हवामान विभागाची चेतावणी!

news

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामाबाबत रायगड पत्रकारांनी आज क्रांतिदिनी केले बोंबाबोंब आंदोलन!

news

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तो धोकादायक खड्डा सिमेंट काँक्रेट ने बुजवला.

news

Leave a Comment