सावंतवाडी प्रतिनिधी: आजच्या तंत्रज्ञांच्या युगात ए आय तुम्हाला सर्वकाही लिहून देऊ शकतो परंतु आपण स्वतः वाचन करणे आणि लिहिणे हे भावनांशी जोडले जाते. मात्र ए आय जे काही देतो ते कृत्रिम आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळायला हवा जे आपल्या जीवनशैलीत अभ्यासक्रमात नको आहे ते डिलीट करायला यायला हवे. जेव्हा तुम्ही मोबाईल तुमच्या पासून डिलीट कराल तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा तुमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या विकासासाठी पुस्तके वाचणे तसेच शालेय जीवनात क्रीडा खेळणे शेती काम करणे बागडणे हेच महत्त्वाचे आहे. असे मत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी व्यक्त केले.
कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. . महा-ई-सेवा केंद्र,कलंबिस्त व कलंबिस्त हायस्कूलच्या वतीने आयोजित ग्रंथालय पुस्तक वाचक विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्रीधर पाटील उवस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर कलंबिस्त हायस्कूल संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत,सहसचिव चंद्रकांत राणे, अखिल महा ई सेवा संघटना व आधार सेवा संघटना जिल्हाध्यक्ष सुनील खरात, राज्य प्रतिनिधी संदेश कल्याणकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा जिल्हा पत्रकार संघटनेचे खजिनदार संवाद तरुण भारतचे प्रतिनिधी..अॅड.संतोष सावंत, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, संस्थेचे संचालक सुरेश राऊळ, वसंत सावंत, सूर्यकांत राजगे, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, महा ई सेवा संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या सिमा मठकर, सुशील आमोणेकर, मंडल अधिकारी श्रीमती गोरे , तलाठी श्रीमतीनमिता कुडतरकर, रवींद्र म्हापसेकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुभाष राऊळ, महा ई सेवा केंद्र कलंबिस्तचे संचालक प्रमोद नाईक, कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाचे सचिव अनिल उर्फ भाई सावंत, संचालक रुपा सावंत, मुख्याध्यापक अभिजीत जाधव आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सहसचिव चंद्रकांत राणे व मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले.
वाचन संस्कृतीला गती देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी गावातील ग्रंथालयातील जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करावे. वाचलेल्या पुस्तकांबद्दल अभिप्राय लिहावा याच उद्देशाने तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या संकल्पनेतून महा ई सेवा केंद्र, कलंबिस्त व कलंबिस्त हायस्कूलच्या वतीने शालेय निबंध स्पर्धेतील विजेते विद्यार्थी लहान गट- प्रथम क्रमांक- कु.किर्ती एकनाथ राऊळ, द्वितीय क्रमांक-कु.अनुराधा अजित कदम, तृतीय क्रमांक-लक्ष्मण एकनाथ राऊळ व उत्तेजनार्थ-धोंडी किशोर नाईक, मोठा गट- प्रथम क्रमांक-कु.समिक्षा निळकंठ गुरव, द्वितीय क्रमांक-कु.श्रृती गजानन राऊळ, तृतीय क्रमांक- कु.ऋतुजा संतोष सावंत, उत्तेजनार्थ-कु.हर्षिता राजकिरण पास्ते या विद्यार्थ्यांना महा ई सेवा केंद्र पुरस्कृत प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व भेटवस्तू अशा स्वरुपाचे पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना.श्री पाटील पुढे म्हणाले कि, आज समाजामध्ये आपण खूप काही ऐकतो आहोत. आज भोंदू महाराज हे स्वतःच्या स्वार्थासाठी देवाच्या नावाखाली लोकांना फसवत आहेत. मग अशावेळी आपण जर सजग व्हायचे असेल तर आपल्यामध्ये शैक्षणिक प्रगती होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्ही शैक्षणिक काळातच तुम्ही अवांतर वाचन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. श्यामची आई हे पुस्तक तुम्ही वाचलात आणि त्यातून तुम्ही निबंध लिहिलात विद्यार्थ्याने उत्कृष्टपणे आपल्या कौशल्यपणे लिखाण केले आहे. ही निबंध व वकृत्व स्पर्धेची परंपरा यापुढेही शाळेत कायम ठेवावी.
महा ई सेवा केंद्र च्या माध्यमातून प्रमोद नाईक त्यांच्या टीमने हे उपक्रम घेतले यापुढे त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्यरत राहावे. शाळेचे शिक्षक व कर्मचारी व संस्थाचालक यांनी उत्तम रित्या ही स्पर्धा घेतली त्याचे त्यांनी कौतुक केले. माझा सैनिकी गाव दरवर्षी वकृत्व स्पर्धायावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा संवाद तरुण भारतचे सावंतवाडी प्रतिनिधी ॲड संतोष सावंत म्हणाले सह्याद्री पट्ट्यात प्रत्येक घरटी सैनिकी परंपरा असलेली गावे आहेत. देशसेवा या भागाने अनुभवले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच जर तुम्ही काहीतरी वाचलात इतिहासाची चालती पाने चाललात तर तुम्हाला निश्चितच पुढील काळात त्याचा फायदा होईल. जिल्हा ग्रंथालय आणि कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय कलंबिस्त हायस्कूल यांच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला वाव देण्याच्या दृष्टीने आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात जर विद्यार्थ्यांना वास्तव्य जीवनाकडे वळवायचे असेल तर आपल्याच भागातील सैनिकी गावाची महती जाणण्यासाठी आणि ते अभ्यासण्यासाठी शालेय स्तरावर वकृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात येईल निबंध व वकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मुले प्रगतीच्या दिशेने आपले भवितव्य घडवू शकतात असे स्पष्ट केले.
यावेळी महा ई सेवा केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा व्यक्त सुनील खरात, महा ई सेवा केंद्र संचालका सीमा मठकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेतील इयत्ता दहावीच्या १९९२- ९३ च्या बॅचच्या वतीने फॅन भेटवस्तू व विद्यार्थीनी कु.मयुरी महादेव मेस्त्री यांचे पालक श्री. महादेव मेस्त्री(वेर्ले) यांनी यांनी रोख रु.एक हजार देणगी दिली. या कार्यक्रमाला पालक, माजी विद्यार्थी व प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी, सूत्रसंचालन किशोर वालावलकर तर आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले.
