स्टोरी

सावंतवाडीत गॅस सिलेंडर वितरणात मनमानी ? घरपोच सेवेशिवायच शुल्क वसुली; ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी.

Spread the love

सावंतवाडी: शहरात तसेच तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडर मिळणे हे ग्राहकांसाठी मोठे आव्हान ठरत असून, सिलेंडर वितरण व्यवस्थेतील मनमानी कारभारामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शासनाच्या स्तरावर गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गॅस वितरण करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून घरपोच सेवा देणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी ही सेवा दिली जात नसल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे. विशेष म्हणजे घरपोच सेवा न देता देखील त्या सेवेसाठी आकारण्यात येणारे शुल्क ग्राहकांकडून वसूल केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याशिवाय, ओटीपी आणि नेटवर्क समस्येच्या नावाखालीही ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे बोलले जात आहे.

काही ठिकाणी कार्यालयात नेटवर्क उपलब्ध नसल्याचे सांगून ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करण्यास अडथळे निर्माण केले जातात आणि त्याऐवजी रोख रक्कम देण्यास भाग पाडले जाते, अशीही तक्रार पुढे येत आहे.या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, गॅस वितरण व्यवस्थेबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. गॅस वितरणातील अनियमितता थांबवून ग्राहकांना घरपोच सेवा पारदर्शकपणे मिळावी आणि अतिरिक्त शुल्क वसुलीवर नियंत्रण आणावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


Spread the love

Related posts

घावनळेत ३ कोटी ५४ लाख आणि नेरूर येथे २ कोटी ३९ लाखाच्या रस्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ.

news

सावंतवाडी वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती मळगावमार्फत वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा..!

news

ठेकेदाराकडून शाळांना निकृष्ट धान्य पुरवठा!

news

Leave a Comment