स्टोरी

आतंकवादी आक्रमणात अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित ठेवण्‍याविषयीचा तज्ञांचा अहवाल राज्‍यशासनाला सादर

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: आतंकवादी आक्रमण, तसेच अन्‍य मानवनिर्मित आपत्ती यांपासून रुग्‍णालये, पंचतारांकित हॉटेल्‍स, शाळा, देवस्‍थाने आदी अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित कशा ठेवव्‍यात? याविषयी उपाययोजना सुचवणारा अहवाल तज्ञ समितीने राज्‍यशासनाकडे सादर केला आहे. तज्ञांच्‍या समितीने ३ मे या दिवशी मंत्रालयात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा अहवाल त्‍यांच्‍याकडे सुपुर्द केला. तज्ञांच्‍या समितीचे अध्‍यक्ष प्रवीण परदेशी, सदस्‍य अपर मुख्‍य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिकेचे मुख्‍य अभियंता सुनील राठोड, वास्‍तूविशारद संदीप ईश्‍वरे, एन्.आर्. शेंडे यांनी हा अहवाल मुख्‍यमंत्र्यांना दिला. आतंकवादी आक्रमणे, मानवनिर्मित्त आपत्ती यांमध्‍ये जीवित आणि वित्त हानी होऊ शकते, तसेच आर्थिक विकासाला त्‍याचा फटका बसतो, हे लक्षात घेऊन हे टाळण्‍याच्‍या दृष्‍टीने हा अहवाल सिद्ध करण्‍यात आला आहे.


Spread the love

Related posts

स्वामीभक्त ठाकूर मामा परिवारा कडून महेश इंगळेंचे औक्षण …!

news

अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा प्राप्ती! – अनुराधा पौडवाल 

news

‘पशुप्रेम केवळ हिंदू यात्रांमध्ये, ईदच्या वेळी का नाही ?’ या विषयावर विशेष संवाद !

news

Leave a Comment