स्टोरी

देऊळबंद’ चित्रपट संकल्पनेचे यश सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल..! – महेश इंगळे

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: अक्कलकोट वटवृक्ष निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांच्या प्रचिती संकलनेवर आधारीत व मराठी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध व दिग्गज लेखक – दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा ‘देऊळबंद २’ या भक्तीमय मराठी चित्रपटाने चित्रपटातील प्रगल्भ स्वामी सहवास व स्वामींच्या प्रचितीच्या माध्यमातून देऊळबंद २ या चित्रपटाने केवळ ५० दिवसात १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. याचे पुर्ण श्रेय स्वामीभक्त दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या देऊळ बंद स्क्रीप्ट संकल्पनेला आहे म्हणून मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात देऊळबंद चित्रपट संकल्पनेचे यश सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. श्री स्वामी समर्थांवर आधारित देऊळ बंद २ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींचा व्यवसायिक टप्पा पुर्ण केला. यानिमीत्ताने पुण्यातील ऑक्सफोर्ड गोल्ड या सप्त तारांकीत रिसॉर्ट येथे दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आयोजीत केलेल्या ‘गोष्ट मोठी १०० कोटी’ या कृतज्ञता सोहळ्यातील कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरुन महेश इंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिग्दर्शक प्रविण तरडे व श्री स्वामी समर्थ फेम मोहन जोशी यांनी सांस्कृतिक मंत्री आ.आशिष शेलार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांचा श्री स्वामी समर्थांची मुर्ती, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

पुढे बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की सुरुवातीला प्रविण तरडे यांची देऊळ बंद चित्रपट ही संकल्पना ऐकूनच थोडेसे विचीत्र वाटले, नंतर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी विनंतीद्वारे चित्रपटाची कथा निट समजावून सांगीतली व प्रदर्शनानंतर श्री स्वामी समर्थांच्या इच्छेने देऊळ बंद या दोन्ही चित्रपटांना रसिक भक्तांनी दाद दिली याचे श्रेय दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या सोबतच तमाम स्वामी भक्तांनाही आहे असे मनोगत व्यक्त करून दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, निर्माते कैलाश वाणी, सिटी प्राइड थिएटर्सचे चाफळकर बंधू, अभिजीत पानसे, अवधूत गुप्ते, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, सुबोध भावे, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, अभिजीत खांडकेकर, हार्दीक जोशी,विजू माने, सलील कुलकर्णी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, तुषार मोरे, अंकूश केत, स्वप्निल गायकवाड, दशरथ लोंढे, स्वामीनाथ मुसळे यांच्यासह चित्रपट नगरी मधील गुणी कलावंत, व दिग्दर्शक उपस्थित होते.

याप्रसंगी धर्मवीर चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केल्याबद्दल अभिनेता प्रसाद ओक, क्षितिश दाते यांचा तर मुळशी पॅटर्न चित्रपटाबद्दल ओम भूतकर याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी लीड मीडियाचे विनोद सातव, अश्विनी तेरणीकर आणि टीमचा विशेष सत्कार करण्यात आला.हा चित्रपट महाराष्ट्रात गावोगावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अतुल कुडले, रमेश परदेशी आणि विनोद वणवे त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. तसेच कुशल कोंडे अनुप गोरे व मंदार आडकर यांनाही एक लाख रुपये मानधन तरडे यांनी जाहीर केले. यावेळी देऊळबंद १ आणि २ च्या यशानंतर प्रवीण तरडे यांनी ‘देऊळबंद – ३ या चित्रपटाची घोषणा केली. गुहागर ते अमेरिका अशी गोष्ट या चित्रपटात असल्याचे त्यांनी सांगितले.

दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि आम्ही चांगले मित्र आहोत. पहिल्यापासूनच प्रवीणला प्रामाणिकपणे कष्टाची सवय आहे. त्यामुळेच त्याने १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याचे यश मिळवले आहे. त्याच्याकडून यशाची ही मालिका भविष्यातही सुरू राहावी या करीता त्यांच्या दिग्दर्शन कार्याला आमचे नेहमीच सहकार्य व शुभेच्छा असतील -मुरलीधर मोहोळ – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री, पुणे▪️ खूप प्रतिकूल परिस्थितीत प्रविणने सुरु केलेली ही वाटचाल स्वामी कृपेने आज वटवृक्षात रुपांतरीत झाली आहे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मागणारा हा माणूस वाचनवेडा आहे. चित्रपटसृष्टीत राहूनही प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व, चारित्र्यवान, संस्कारी आणि संस्कृती जपणारा माणूस म्हणून अल्पावधीतच प्रविण ने आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. देऊळ बंद चित्रपट स्क्रीप्टच्या माध्यमातून त्याचे व्यक्तीमत्व आता निस्सीम स्वामी भक्त म्हणून प्रचलीत आहे. प्रवीण यांच्याकडून आगामी काळातही अशाच भक्तीमय चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन होत राहतील आणि त्यामाध्यमातून आपले धर्म, संस्कृती, भक्ती आणि रुढी परंपरा यांचा वारसा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत असतील. प्रविण याच्या दिग्दर्शन कार्यास आमच्या शुभेच्छा – आ.आशिष शेलार – सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य


Spread the love

Related posts

जलवाहिन्या दुरुस्तीचा खर्च कोणाच्या डोईवर?; सावंतवाडीत गॅस वाहिनीच्या कामामुळे नगरपरिषदेच्या निधीवर ताण.

प्रसाद परब

नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ?

news

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीस माजी अध्यक्ष श्री रमेश पई यांचे कडून एक लाख रुपयांची भरीव देणगी.

news

Leave a Comment