स्टोरी

माजी विद्यार्थी श्री रमेश कदम यांजकडून कलंबिस्त हायस्कूलला एक लाख रुपये देणगी.

Spread the love

सावंतवाडी: कलंबिस्त इंग्लिश स्कूल,कलंबिस्त चे माजी विद्यार्थी तथा सेवानिवृत्त लघु पाटबंधारे विभाग, ठाणे चे शाखा अभियंता श्री. रमेश अर्जुन कदम यांनी आज प्रशालेला स्नेहभेट देत व रोख एक लाख रुपयांची देणगी दिली. प्रशालेच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले,”या शाळेचे आपल्यावर मोठे ऋण आहेत. ग्रामीण भागात अशा प्रकारची शिक्षणाची सुविधा असल्यानेच आपल्याला तत्कालीन परिस्थितीत चांगले शिक्षण घेता आले.या शाळेत १९८७-८८ मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत आपण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. तसेच या प्रशालेत ड्रॉइंग ग्रेडच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षांमध्ये उत्तम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो होतो. या परीक्षेचा फायदा आपल्याला ‘अनुरेखक’ (सिव्हिल ड्राफ्ट्समन) पदासाठी कोकण निवड मंडळाच्या भरती प्रक्रियेत झाला व आपण, १९९२ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेत शासकीय सेवेत रुजू झालो. त्यानंतर स्थापत्य अभियंता, लघु पाटबंधारे, ठाणे विभागात शाखा अभियंता असा आपला प्रवास करीत ३३ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालो. आपल्या या वाटचालीत प्रशालेतील शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन,संस्था चालकांचे सहकार्य यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. या प्रशालेतील विद्यार्थांनी चांगला अभ्यास करण्याबरोबर कला,क्रीडा कौशल्ये आत्मसात करीत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा असे विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. शहरी भागाच्या तुलनेत कलंबिस्त हायस्कूल ही ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणारी एक उपक्रमशील शाळा आहे असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. त्यांच्या या दातृत्वाबद्दल संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, सर्व संचालक सदस्य, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी आभार मानले.


Spread the love

Related posts

जागतिक वसुंधरा दिनी कल्याण मधील रिंडरोड सभोवताली वृक्षांची लागवड

news

फणसगाव आणि विठला देवी गावातील श्री देव महादेव, श्री देवी महालक्ष्मी, श्री देवी महाकाली मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा १८ फेब्रुवारी पासून…!

news

शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घाला! युनेस्को

news

Leave a Comment