स्टोरी

श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनिसवाडा येथे १५ जुलै रोजी श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन..!

Spread the love

सावंतवाडी (दीपक पटेकर): सावंतवाडी सबनिसवाडा येथील श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर मध्ये आषाढ शुद्ध प्रतिपदा बुधवार दिनांक १५ जुलै २०२६ रोजी श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ७.०० वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून दुपारी महाप्रसाद आहे, तरी सर्व भक्तगणांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक उपसमितीने केले आहे. यावेळी सकाळी ८.०० वा. श्री दत्तपूजा, श्री स्वामी पादुकांवर अभिषेक, एकादशनी, ९.०० वा.श्री सत्यदत्त महापूजा, १२.३० वा. आरती, १.०० वा. महाप्रसाद, सायंकाळी ७.०० आरती, ८.०० वाजता भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


Spread the love

Related posts

सिंधू पुत्र भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांना कोकण रत्न सन्मान २०२३ पुरस्कार प्रदान..

news

पंढरपूर, देहू, आळंदी, पैठणसह सर्व मंदिरे-तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत! पंढरपूर येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी….

news

मसुरे येथे १६ ऑक्टोंबर रोजीअर्धी गुरुदक्षिणा नाट्यप्रयोग…!

news

Leave a Comment