स्टोरी

कलंबिस्त हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या सन १९९२-९३ च्या विद्यार्थ्यांकडून शाळेला सिलिंग फॅन भेट.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: शालेय जीवनात आपण ज्या शाळेत शिकलो सावरलो त्या शाळेच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात व शाळेचे ऋण फेडता यावेत यासाठी कलंबिस्त हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या सन १९९२-९३ चा बॅचने गेल्या वर्षीपासून अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला पाचशे रुपये बँकेत जमा करायचे आणि त्यातून शाळेला व शाळेतील विद्यार्थ्यांना सढळते मदतीचा हात द्यायचा. असा संकल्प केला आहे. त्या उपक्रमातून या बॅचने आज शाळेला एक सिलिंग फॅन भेट दिला. आतापर्यंत या शाळेला या बॅच कडून मदतीचा हात दिला गेला आहे. दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान व मराठी भाषेत सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव दरवर्षी केला जातो.

या दहावीच्या बॅच च्या वतीने आज सहा एप्रिलला.तहसीलदार श्रीधर पाटील.व संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांच्याकडे या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड संतोष सावंत यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. या उपक्रमाला शाळा संस्थेचे सहसचिव चंद्रकांत राणे संचालक वसंत सावंत, सुरेश राऊळ, सुभाष राऊळ, महाई सेवा केंद्राचे सुनील खरात, प्रमोद नाईक, सीमा मटकर, संदेश कल्याणकर, सुशील अमोनेकर, मंडल अधिकारी, श्रीमती गोरे, तलाठी नमिता कुडतरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख रमेश सावंत, रूपा सावंत, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत आधी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने शाळेचे असे ऋण व्यक्त होणे ही बाब कौतुकास्पद आहे. असे गौरव उद्गार काढले.


Spread the love

Related posts

उपरालकर देवस्थानच्या वळणावर अपघात..! सुदैवाने मोटर चालक बचावला.

newss

व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा.

news

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’स उत्साही वातावरणात प्रारंभ !

news

Leave a Comment