स्टोरी

मसुरे येथे २८ ते २९ एप्रिल रोजी मोफत नृत्य कार्यशाळा.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: भंडारी समाज महासंघातर्फे दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात, त्याचाच एक भाग म्हणून आपल्या कोकणातील मुलांना नृत्यकलेमध्ये आपले करिअर करता यावे यासाठी मसुरे येथील आरपी बागवे हायस्कूल येथे २८ ते २९ एप्रिल या दिवशी भंडारी समाज महासंघ,सौरभ कांबळी इन्स्टिट्यूट ऑफ डान्स या संस्थेतर्फे आणि मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नृत्यकला शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आपल्या कोकणातील मुलांना नृत्य शिकवण्यासाठी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शन श्री सौरभ कांबळी आणि त्यांची टीम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सौरभ कांबळी इन्स्टिट्यूट ऑफ त्यांच्या या संस्थेतर्फे त्यांनी अनेक मुला मुलींना नृत्य शिकवले आहे.

तसेच सौरभ कांबळी यांनी परदेशात सुद्धा आपल्या भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांना भारतात आणि परदेशात नृत्यकलेत अनेक पुरस्कार मिळालेले आहे.यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना, प्रसिद्ध नृत्य कोरिओग्राफर आणि भंडारी महासंघाच्या ऋतुजा कांबळी मॅडम, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर दीपक परब मुंबई कमिटीचे सचिव प्रसाद बागवे लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन 28 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.तसेच ही नृत्य शिबिर सकाळी ९ ते १२ या वेळेत दोन दिवस संपन्न होणार आहे. आपण या नृत्य शिबिराचा जिल्ह्यातील नवोदित नृत्य कलाकार, तसेच व्यावसायिक नृत्य कलाकार आणि शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भंडारी महासंघाच्या वतीने आणि मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दत्तप्रसाद पेडणेकर मसुरे (पत्रकार) मो.94 21 14 58 27 येथे संपर्क साधावा..


Spread the love

Related posts

गोळवण ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारला बंधारा..! १ लाख १० हजार रुपये आला खर्च.

news

आधी मुली गायब झाल्याविषयी चर्चा करा आणि नंतर त्यांच्या आकडेवारीविषयी बोला! अभिनेत्री अदा शर्मा

news

सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहनच्या विरोधात परशुराम उपरकर समर्थक आंदोलन छेडणार.

news

Leave a Comment