सावंतवाडी वार्ताहर: सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावामध्ये जाधव वाडीत एक पन्नास वयाची व्यक्ती गेली १५ ते २० वर्ष आपल्या अंगात मूळपुरुष देवाचे वारेसूत्र येत असल्याचे भासवून अनेक भाविकांच्या समस्या सोडवीत असल्याचे तसे भूत लागल्यास भूत उतरविणे, करणी उतरविणे आणि सामान्य जनतेची फसवणूक करीत असल्याची माहिती समजतात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी आपल्या सोबत भाऊ गोसावी यांना घेऊन काही दिवसापूर्वी त्यांच्या घरी गेले. सदर व्यक्तीच्या अंगात मूळ पुरुषाचे वारेसूत्र आल्यानंतर दिव्य शक्तीने काय काय ओळखता येते याची शहानिशा केली. यावेळी विजय चौकेकर यांनी आपल्या हयात नसलेल्या मुलाला लग्न होऊन सात वर्षे झाली तरी मूलबाळ होत नाही ते कशामुळे हे विचारले असता त्याने मुलाला अतृप्त आत्म्याने झपाटलेला आहे.
तसेच सुनेवर करणी केलेली आहे. मुलावरील अतृप्त आत्मा बाजूला केल्या शिवाय आणि सुनेवरील करणी काढल्याशिवाय मूल होणार नाही असे सांगून त्यावर उपायही सांगितले. तसेच चौकेकर यांना पत्नीच्या छातीवर गाठ आहेत त्यावर तीन दिवसात तीर्थ घ्या बरे होईल असे सांगितले . देवाला काहीच ओळखता न आल्याने पुढच्यावेळी पुन्हा मोठा मुलगा म्हणून अतूल दळवी , छोटा मुलगा म्हणून योगेश वराडकर आणि मोठ्या मुलाची सासू म्हणून उज्वला येळावीकर आणि अजित कानशिडे यांना घेऊन गेले . त्यावेळी उज्वला एळावीकर यांनी आपल्या घरात चोरी झाल्याचे सांगतात चोरी करणाऱ्यावर त्यांनी जाप घातला .तीन दिवसात चोरी करणारा वेडापिसा होऊन दागिने आणून देईल असेही सांगितले . लहान मुलगा म्हणून नेलेल्या योगेश वराडकर याच्यावरील स्मशानातील पिश्चात्याने पकडले आहे ते त्याने काढण्याचा प्रयत्न केला वारेसूत्राला चौकेकर यांना मुलगा नाही, सून नाही, उज्वला येळावीकर यांच्या घरात चोरी झालेली नाही है दिव्य शक्तीने ओळखता आलेले नाही.
सदर व्यक्तीला आपण कोण आहोत याची खरी ओळख विजय चौकेकर यांनी करून दिली तसेच आपल्यात दैवी शक्ती असल्यास ८० लाखाचे आवाहन स्विकारा असेही सांगितले . मात्र माझ्यात मूळ पुरुष येतो व लोकांच्या समस्येवर उपाय सांगतो मी आवाहन स्विकारणार नाही असे सांगायला सुरुवात केली . *शेवटी शरणांगती* जादूटोणा विरोधी कायद्या २०१३ आणि ड्रग्ज ॲन्ड मॅझिक रेमिडीज ॲक्ट १९५४ समजावून सांगतात त्यामध्ये असलेली शिक्षा आणि दंड लक्षात येतात तसेच या कायद्यात सहकार्य करणारे मूले मुलींना सुद्धा तेवढीच शिक्षा होऊ शकते हे लक्षात येताच त्याने विजय चौकेकर यांच्या समोर शरणागती पत्करली.
शेवटी लिहून दिला कबुलीनामा..! आपण सांगितल्या समस्या आणि त्यावरचे उपाय जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा ठरत असल्याचे लक्षात येताच त्या भोंदूबाबांनी त्यांच्यासमोर लेखी कबुलीनामा लिहून दिला . देवाच्या नावाने कोणाच्याही समस्या सोडविणार नाही, भूत उतरविणे, करणी काढणे, असे कृत्य करून पैसे घेणार नाही, औषध म्हणून कुणाला विभूती देणार नाही. तसेच माझ्या परिसरात यापुढे कोणीही माझ्याकडे समस्या विचारायला येऊ नये असा बोर्ड लावेन. आमच्या येथे यापुढे अंधश्रद्धा निर्माण होणारे प्रकार घडणार नाहीत याची हमी देतो . मात्र माझ्यावर अथवा माझ्या मुलांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून नये अशी विनंती केली . त्यांची मुलगी व मुलगा अजून शाळा शिकत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगती मध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्याकडून व त्यांच्या मुलांकडून लेखी लिहून घेण्यात आले आणि यापुढे प्रकार घडल्यास रितसर गुन्हा दाखल केला जाईल हे सांगण्यात आले .परिसरात दोन दिवसात तसा बोर्ड लावण्यास सांगितले .त्याप्रमाणे तसा बोर्डही परिसरात त्यांनी लावला. आपल्या परिसरात असे भोंदू बाबा आणि जादूटोणा करणारे कोणी असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यातील दक्षता अधिकारी यांना द्यावी असे आवाहन जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले आहे .
