स्टोरी

अक्कलकोट श्री.वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.

Spread the love

अक्कलकोट: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात २९ जुलै रोजी श्री गुरुपौर्णिमा असुन गुरुपौर्णिमेस अनन्य साधारण महत्व आहे. भाविक येथील वटवृक्ष निवासी स्वामींना गुरु मानून या दिवशी दर्शनाकरीता विशेष गर्दी करतात. गुरुंचे गुरु, सदगुरुंचे गुरु म्हणजे येथील ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज होय. गुरुंचा महिमा म्हणजे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान. गुरुपौर्णिमे रोजी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नित्य नियमाने होणारी काकडआरती पहाटे ४ वाजता होईल. सालाबादाप्रमाणे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता व भाविकांचे दर्शन सुलभतेने होणेकरीता गुरुपौर्णिमे रोजी मंदीर रात्री २ वाजता उघडण्यात येईल. या दिवशी स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. अभिषेकाची पावती केल्यास अंगारा प्रसाद मिळेल.सकाळी ११ वाजता नैवेद्य आरती होईल. त्यानंतर सर्व स्वामी भक्तांसाठी दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे भोजन महाप्रसादाची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. रात्री ७:५० ते रात्री ८:३० या वेळेत श्रींची शेजारती संपन्न होईल. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता महिला व पुरुष भक्तांची स्वतंत्र दर्शन रांग, पोलीस बंदोबस्त, वाहतुक पोलीस बंदोबस्त, बॅरेकेटींग दर्शन रांग, दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय, प्रथमोपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, व्हीलचेअर इत्यादी सुविधांच्या माध्यमातून श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. गुरुपौर्णिमे निमीत्त आयोजीत सुविधांच्या माध्यमातून सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, सेवेचा, व भोजनप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

निधी केळुसकर आणि अर्शीन शेख ठरल्या सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार..! कुडाळच्या चिमणी पाखर संस्थेचं आयोजन 

news

अन्यथा आमच्या पद्धतीने आंदोलन छेडून वीज वितरणाला उत्तर देऊ – आबा चिपकरांचा इशारा

news

माणगाव येथे “इनरव्हील”,या महिलांच्या सेवाभावी संस्थेमार्फत शेती क्षेत्राला प्रत्यक्ष भेट

प्रसाद परब

Leave a Comment