सनातन

सनातन संस्थेतर्फे सिंधुदुर्गात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन’..!

Spread the love

सिंधुदुर्ग ( श्री संतोष परब): ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, धर्मांतर, गोहत्या आदी समस्यांत ‘कार्पोरेट जिहाद’, ‘जैविक जिहाद’ यांसम नव्या संकटांची भर पडली आहे. सामान्य व्यक्तीला वरीलपैकी कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागू शकते. अशा संकटसमयी काय करावे, याचे उत्तर भारताचे अद्वितीयत्व असलेल्या गुरु-शिष्य परंपरेने आधीच देऊन ठेवले आहे. ते समाजापर्यंत पोचवावे, यासाठी सनातन संस्था यंदाचा ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा ‘रामराज्याच्या निर्मितीची दिशास्पष्ट करणारा उत्सव म्हणून साजरा करत आहे. हा उत्सव बुधवार, २९ जुलै या दिवशी होत आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८९ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले अशा सहा ठिकाणी महोत्सव होणार आहेत.या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प. पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचेसत्कार, राष्ट्रभक्त अन् धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्यास्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप, तसेच ‘रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयकफलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केलेआहे.ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ : देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’आयोजित करण्यात केले आहेत. २९ जुलैला मराठी भाषेतील ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ पुढील मार्गीकेवर (लिंकवरून) घेता येईल. https://www.sanatan.org/mr/gurupurnima

स्थानिक गुरुपौर्णिमेचे पत्ते व वेळा..!

१). श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसंडे, देवगड दु. ३.३० वाजता

२). मातोश्री मंगल कार्यालय, नवरे हॉस्पिटल समोर, कणकवली वेळ दु. ३ वाजता३. मराठा समाज भवन सभागृह, कुडाळ हायस्कूल जवळ, कुडाळ दु.

३)३० वाजता ४. दैवज्ञ भवन, मालवण सायं. ४ वाजता

५) . साई दरबार सभागृह, वेंगुर्ला दु. ३.३० वाजता६. बॅ. नाथ पै सभागृह, नगरपरिषद, सावंतवाडी दु. ३.३० वाजताआपला नम्रश्री. शंकर निकम,सनातन संस्था (७५८८५६९४३३)


Spread the love

Related posts

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप…! भारतासह २३ देशांतील ३० हजार हिंदूंचा सहभाग.

news

‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान !

news

स्वातंत्र्यदिनाच्या काळात प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन.

newss

Leave a Comment