स्टोरी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका लवकरच २४ तास रुग्णांच्या सेवेत- रवी जाधव

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी रजिस्टर संस्थेकडून गेली सात वर्ष रुग्णांना तत्काळ सेवा दिली जाते. तर या संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची २४ तास दखल घेतली जाते. परंतु काही वेळा गंभीर रुग्ण तसेच अपघात ग्रस्त रुग्णांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी किंवा जिल्हा रुग्णालय ओरोसला घेऊन जायचं असेल तर कधी कधी इमर्जन्सीला १०८ उपलब्ध होत नाही त्याचा फटका रुग्णाला बसतो हे आमच्या निदर्शनास नेहमीच येत त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने रुग्णांसाठी २४ तास सेवा तीही अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी रुग्णवाहिका लवकरात लवकर आणून ही सेवा रुग्णांना दिली जाणार असल्याचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक श्री. सतीश बागवे यांनी सांगितले. शहरातील दानशूर व्यक्तींनी या आव्हानाला प्रतिसाद देऊन अतिशय चांगल्या प्रकारे रुग्णवाईसके साठी आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार दर्शवला आहे. सैनिक पतसंस्था शहर शाखेकडून दहा हजाराची मदत या उपक्रमासाठी दिली गेली आहे.

यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी पुढाकार घेतला तर चेअरमन श्री बाबुराव कविटकर, व्हा चेअरमन चंद्रकांत शिरसाठ, उपकार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे, प्रशासन अधिकारी विठ्ठल बिडवे, संचालक भिवा गावडे उपस्थित होते यास सर्व मान्यवरांनी या देणगीसाठी सहकार्य केले. तरी या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी इच्छुक दात्यांनी आर्थिक मदतीसाठी दिलेल्या सदरच्या क्यूआर कोडचा वापर करणे व संबंधित नंबर वर स्क्रीन शॉट पाठवणे कारण आपल्याला या रजिस्टर संस्थेची रीतसर देणगी पावती दिली जाईल. तरी या सेवाभावी उपक्रमासाठी आपण पुढाकार घ्यावा जेणेकरून रुग्णांना आम्ही जास्तीत जास्त सेवा पुरवण्यासाठी यशस्वी होऊ त्यासाठी आपल्या सर्वांचेच सहकार्य महत्त्वाचे आहे असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम यांनी केले आहे.

CBS/C 22407000000744IFC CODE SIDC0001022MICR CODE 416801352

संपर्क- रवी जाधव 9405264027 रूपा मुद्राळे- 9422633971 लक्ष्मण कदम -9423304674


Spread the love

Related posts

गोविंद चित्र मंदिर समोरील रस्त्यावर सुकलेल्या वृक्षाची मोठी फांदी पडली..! मोटर सायकल स्वार सुदैवाने वाचला

news

तुळस कुंभारटेम्ब येथील पिसाळलेल्या आणि भटक्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करा! नारायण कुंभार

news

पालघरमधील केमिकल कंपनीला भीषण आग!

news

Leave a Comment