स्टोरी

मुणगे हायस्कूलच्या गावठी बाजारात ३० हजार रुपयांची उलाढाल!

Spread the love

मसुरे |प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलमध्ये आयोजित गावठी बाजारामध्ये तब्बल 30 हजार रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गावठी बाजार व खाद्यपदार्थ स्टॉल हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमाचे उदघाटन संस्था उपाध्यक्ष सुरेश बांदेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, संतोष लब्दे, मुख्याध्यापिका एम.बी. कुंज, पोलीस पाटील सौ.साक्षी गोविंद सावंत, चंद्रकांत रासम, दशरथ मुणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, उद्योजकतेची ओळख, आर्थिक व्यवहारांचे महत्त्व आणि स्वावलंबनाची जाणीव करून देणे हा होता.

विद्यार्थ्यांनी स्वतः नियोजन करून विविध गावठी वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू आणि पारंपरिक पदार्थांचे स्टॉल उभारले. प्रत्येक स्टॉलची मांडणी आकर्षक व सुबक करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत विक्री-खरेदीची प्रक्रिया अनुभवली. नफा-तोटा मोजणे, किंमत ठरवणे, वस्तूंची मांडणी, ग्राहक सेवा यांसारख्या अनेक व्यावहारिक गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळाला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला.कार्यक्रमास उपस्थित पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

यावेळी मुणगे गावातील प्राथमिक शाळा व सर्व शिक्षक सहभागी झाले होते.हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शाळेतर्फे सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसाद बागवे, हरिदास महाले, सौ. गौरी तवटे,सौ. रश्मी कुमठेकर, श्रीमती सुविधा बोरकर, तेजल बागडे,नामदेव बागवे,स्वप्नील कांदळगावकर,मनोज मुणगेकर यांनी मेहनत घेतली.


Spread the love

Related posts

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून घेण्यात आलेला कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न.

news

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक आमच्या ताब्यात द्या! आनंद शिंदे….

news

समाजातील युवा पिढीने थोर पुरुषांचे विचार पुढे नेण्याचे कार्य करावे! अजित पवार

news

Leave a Comment